Wedding Rituals : अंगाला हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर का पाठवत नाहीत? कारण ऐकून तुम्हीही नियम पाळाल

दिवाळी आणि तुळशीच्या लग्नानंतर भारतात लग्नसमारंभांना सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर पासून लग्नाचे मुहूर्त असल्याने अनेक तरुण तरुणी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकत आहेत.  कोणताही धर्म असो त्या धर्मात लग्नाशी संबंधित आपल्या विविध प्रथा परंपरा असतात. अशीच हिंदू लग्नातील एक प्रथा म्हणजे हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर न पाठवणे. परंतु या प्रथेमागचं कारण नेमकं काय आहे याबाबत जाणून घेऊयात. 

| Nov 22, 2024, 20:31 PM IST
1/8

नोव्हेंबर महिन्यात २२, २३, २४, २५, २६ आणि २८ या तारखांना विवाहाचे शुभ मुहूर्त आहेत. तर डिसेंबर महिन्यात २, ३, ४, ५, ९, १० ,११ ,१२ ,१३ , १४, १५ तारखेला विवाहाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे याकाळात अनेक जोडपी लग्नबंधनात अडकतील आणि सर्वत्र विवाहाची धामधूम सुरु असेल. 

2/8

हिंदू धर्मानुसार लग्न करताना त्यासंबंधित अनेक प्रथा आणि परंपरा असतात. वडीलधाऱ्या व्यक्त त्या पाळल्या जाव्यात याकडे विशेष लक्ष देतात. यातीलच एक प्रथा म्हणजे हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर न पाठवणे. मात्र ही प्रथम नेमकी का पडली आणि त्यामागे नेमकं कारण कोणतं याविषयी जाणून घेऊयात. 

3/8

हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर न पाठवणे ही प्रथा का पाळली जाते याबाबत अनेक जण विविध कारण सांगताना दिसतात. मात्र काही जाणकारांनी याबाबत माहिती दिलेली आहे. 

4/8

हळदी समारंभात जी हळद वापरली जाते त्याला एक विशेष सुगंध. त्यामुळे या हळदीने माखलेल्या वधू वराकडे वातावरणातील सर्व प्रकारच्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित होतात.    

5/8

एखादी व्यक्ती जर मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या तेवढी मजबूत नसेल तर वातावरणातील नकारात्मक ऊर्जा तिच्याकडे लगेच आकर्षित होतात. त्यामुळे व्यक्तीवर वाईट परिणाम होतो.   

6/8

लग्नात हळद लागल्यावर वधू आणि वर दोघे पवित्र होतात. त्यामुळे वाईट शक्ती त्यांच्याकडे लगेच आकर्षित होऊ शकतात असा लोकांचा समज आहे. यामुळे हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर पाठवलं जात नाही. 

7/8

काही काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार, लग्नात हळद लावल्याने शरीराचं सौंदर्य वाढतं. हळदीमुळे सर्व प्रकारचे त्वचा रोग आणि शरीराला येणारी दुर्गंधी दूर होते. तेव्हा लग्नात हळद लावण्यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही. 

8/8

Disclaimer : (वरील लेख हा केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. याचा ZEE 24 Taas शी कोणताही संबंध नाही)