मुंबईकरांसाठी मोठी बातमी! फास्ट ट्रेन भायखळ्याला थांबणार नाही तर हार्बर रेल्वेचा प्रवास सँडहर्स्ट रोडपर्यंतच

Mumbai Railway: मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलबद्दल रेल्वे प्रशासनने महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचारत आहे. या निर्णयाचा फटका हार्बर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसणार आहे. 

नेहा चौधरी | Jul 31, 2024, 13:57 PM IST
1/7

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी चाचपणी सुरु करण्यात आलीय. 

2/7

पाचवी आणि सहावी मार्गिकाच्या कामाला सुरुवात झाल्यास मध्य आणि हार्बर मार्गावर लोकल ट्रेनबद्दल मोठे बदल करण्यात येतील. 

3/7

नवीन ट्रॅकसाठी जागा तयार करण्यासाठी मध्य आणि हार्बर मार्गावरील दोन स्टेशनबद्दल महत्त्वाचे निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. 

4/7

त्यामुळे भविष्यात हार्बर मार्गावरील लोकल ही सँडहर्स्ट रोडपर्यंतच धावणार आहे. याचा अर्थ हार्बर मार्गावरील शेवटच स्टेशन हे सँडहर्स्ट रोड असणार आहे. 

5/7

तर भायखळा स्थानकातून फास्ट लोकलचे प्रवाशी कमी असल्याच रेल्वे प्रशासनाच म्हणं आहे. त्यामुळे भविष्यात भायखळा स्थानकावर फास्ट लोकल थांबणार नाही. 

6/7

एमयूटीपी-२ अंतर्गत सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग सन 2008 मध्ये मंजूर केला होता. 

7/7

रुळांलगत असलेल्या जागेच्या अनुपलब्धतेमुळे सीएसएमटी ते परळ आणि कुर्ला ते परळ अशा दोन टप्प्यांत या प्रकल्पाचे काम सुरु आहे.