देशात पावसाळा, राज्यात उन्हाळा; मुंबईसाठी पुढील पाच दिवस धोक्याचे!

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रातील हवामानाचं चित्र मात्र याहून पूर्ण विरुद्ध असल्याची माहिती समोर येत आहे.   

May 18, 2023, 08:11 AM IST

Maharashtra Heat Wave : संपूर्ण देशात सध्याच्या घडीला पश्चिमी झंझावाताच्या परिणामांमुळं हलका ते मुसळधार स्वरुपातील पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

1/8

अवकाळीनं विश्रांती

Mumbai Maharashtra to vitness heatwave latest weather news

मुंबईसह राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळीनं विश्रांती घेतली असून, उन्हाचा दाह वाढताना दिसत आहेत. येत्या पाच दिवसांमध्येही ही परिस्थिती आणि गंभीर स्वरुप धारण करेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.   

2/8

Mumbai Maharashtra to vitness heatwave latest weather news

3/8

मराठवाडा आणि विदर्भ

Mumbai Maharashtra to vitness heatwave latest weather news

मराठवाडा आणि विदर्भासह पुण्याच्या काही भागांमध्ये तापमान चाळीशीच्याही पुढे जाईल. तर काही भागांमध्ये तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

4/8

मध्य महाराष्ट्र आणि कोकण

Mumbai Maharashtra to vitness heatwave latest weather news

मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवरही उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. किंबहुना किनाऱ्यालगत असणाऱ्या प्रदेशामध्ये आर्द्रतेचं प्रमाणं अधिक असेल असाही इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

5/8

उष्णतेची लाट

Mumbai Maharashtra to vitness heatwave latest weather news

पुढच्या पाच दिवसांसाठीचा हा अंदाज पाहता चालू आठवड्याचा शेवट आणि नव्या आठवड्याची सुरुवातही उष्णतेच्या लाटेनंच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

6/8

उकाडा वाढतोय

Mumbai Maharashtra to vitness heatwave latest weather news

इथे उकाडा वाढत असल्याचं पाहता, राज्यातील आरोग्य यंत्रणांनीही नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 

7/8

उष्माघात

Mumbai Maharashtra to vitness heatwave latest weather news

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शरीरातील पाण्याची पातळी राखून ठेवणं, उन्हापासून स्वत:चा बचाव करणं या आणि इतर अनेक बाबतीय नागरिकांना सूचित केलं जात आहे.   

8/8

शरीरात पाण्याची पातळी

Mumbai Maharashtra to vitness heatwave latest weather news

शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्यास रक्तवाहिन्यांमधील रक्ताचं तापमान वाढून ते घट्ट होतं, ज्यामुळं व्यक्तीला तीव्र झटका येण्याचाही धोका संभवतो. त्यामुळं या बाबतीतही काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.