सूनेच्या डिलिव्हरीआधी मुकेश अंबानी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, नातवाला कडेवर घेत पुरवले लाड; साधेपणा पाहून भारावले लोक

Ambani Family at Siddhivinayak: अंबानी कुटुंबाची सून श्लोका मेहता दुसऱ्यांदा आई होणार आहे. दरम्यान याआधी अंबानी कुटुंब सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलं होतं. त्यांच्या साधेपणाने यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

May 24, 2023, 19:57 PM IST
1/8

अंबानी कुटुंबाची सून श्लोका मेहता दुसऱ्यांदा आई होणार आहे. दरम्यान, याआधी श्लोका मेहता गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती.   

2/8

श्लोका मेहता बुधवारी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती. यावेळी तिच्यासह पती आकाश अंबानी, सासरे मुकेश अंबानी आणि मुलगा पृथ्वी होता.   

3/8

चौघांनीही यावेळी गणपती बाप्पासमोर डोकं टेकवत आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी प्रार्थना केली.   

4/8

दरम्यान मंदिरात जाताना आणि बाहेर येताना मुकेश अंबानी यांनी नातवाला कडेवर घेतलं होतं. मुकेश अंबानी आजोबांप्रमाणे त्याची काळजी घेत लाड पुरवत होते.   

5/8

मंदिरात जाताना श्लोका मेहताने पांढरा ड्रेस आणि गुलाबी दुपट्टा परिधान केला होता. यावेळी तिने अजिबात मेकअप केलेला नव्हता. तसंच आकाश अंबानीने टी-शर्ट घातलेलं होतं.   

6/8

मुकेश अंबानी यांनीही पांढरा कुर्ता घातलेला होता. अंबानी कुटुंबाच्या साधेपणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.   

7/8

श्लोका आणि आकाश अंबानी 2019 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांना एक मुलगा  आहे. दरम्यान लवकरच अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असून त्यानिमित्ताने ते देवदर्शन घेत आहेत.   

8/8

गेल्या आठवड्याभरात तिसऱ्यांदा ते देवदर्शनासाठी पोहोचले आहेत. श्लोका मेहता आणि आकाश अंबानी बाबूनाथ मंदिरातही दर्शनासाठी गेले होते.