अंबानींकडून Jio युजर्सची नवरात्रीतच दिवाळी! नव्या प्लॅनमध्ये 5G डेटा, 98 दिवस Validity; किंमत...

New Jio Plan For Users: देशातील सर्वाधिक युजर असलेल्या टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवा दमदार प्लॅन बाजारात आणला असून या प्लॅनची किंमत आणि त्या मोबदल्यात दिल्या जाणाऱ्या सेवा सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. जाणून घेऊयात या नव्या प्लॅनबद्दल...  

Swapnil Ghangale | Sep 24, 2024, 12:07 PM IST
1/8

jionewplan

जिओचा हा प्लॅन एवढा दमदार आहे की त्यासाठी अनेक ठिकाणी ग्राहकांच्या रांगा लागल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं काय आहे या प्लॅनमध्ये पाहूयात...

2/8

jionewplan

भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले रिलायन्सचे मुकेश अंबानी यांची जिओ कंपनी ही देशातील सर्वाधिक वापरकर्ते असलेली टेलीकॉम कंपनी आहे. भारतीयांच्या इंटरनेट वापरामध्ये जीओ लॉन्च झाल्यापासून बराच बदल झाल्याचं दिसून येत आहे.

3/8

jionewplan

भारतीय लोक ज्या पद्धतीने स्मार्टफोन वापरतात त्यामध्ये जीओच्या लॉन्चिंगनंतर अमुलाग्र बदल झाल्याचं सांगितलं जातं. खरं तर मुकेश अंबानींच्या या कंपनीचा कारभार त्यांचा पुत्र आकाश अंबानी पाहतात. दिवसोंदिवस आकाश यांच्या नेतृत्वाखाली कंपनी भारतभरामध्ये आपला प्रसार करत आहे. भारतातील अनेक भागांमध्ये जीओच्या माध्यमातून पहिल्यांदा इंटरनेट सेवा पोहचली आहे. 

4/8

jionewplan

याच महिन्यामध्ये रिलायन्स जिओने आपल्या सर्व प्रिपेड सेवांचे दर वाढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच ओटीपी सेवा मोफत वापरण्याची सुविदा देणारं प्लॅन्सही बंद करणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे.

5/8

jionewplan

मात्र या सेवा रद्द करण्याचा निर्णय घेत असताना त्याजागी नवीन प्लॅन कंपनी ग्राहकांसाठी घेऊन आली आहे. हे प्लॅन्स काय आहेत पाहूयात. रिलायन्सने 98 दिवसांचा विशेष प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये अनलिमिटेड 5 जी डेटा आणि कॉलिंग देण्यात आलं असून हा प्लॅन 999 रुपयांना असणार आहे.

6/8

jionewplan

999 रुपयांचा हा प्लॅन 98 दिवस सक्रीय असेल. यामध्ये रोज 4 जी स्पीडने 2 जीबी डेटा मोफत दिला जाईल. युजर्सला अनलिमिटेड 5 जी डेटा दिला जाणार आहे. यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत.

7/8

jionewplan

तसेच या पॅकेजअंतर्गत जिओकडून देण्यात येणाऱ्या इंटरनेट सेवेसाठी नेट स्पीडचे कोणतेही बंधन यावर असणार नाही. मात्र या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे 5 जी स्मार्ट फोन असणं आणि ते राहत असलेला परिसर 5 जी सेवेच्या कव्हरेजमध्ये असणं गरजेचं आहे.  

8/8

jionewplan

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 मोफत एसएमएसही मिळणार असून, देशभरामध्ये मोफत रोमिंग कॉलिंगची सेवा मिळणार आहे. तसेच जिओ क्लाऊड, जिओ सिनेमा, जिओ टीव्हीची सेवा मोफत मिळणार आहे. प्लॅन सक्रीय असेपर्यंत ही सेवा वापरता येईल. मायजिओ अॅपवरुन, जिओ वेबसाईटवरुन किंवा अधिकृत रिलेटलरकडून हा 98 दिवसांचा रिचार्ज ग्राहकांना करता येईल.