भारतातील सर्वात महागडं घर, 27 मजले, 6 लोकांसाठी 600 स्टाफ; अंबानींच्या घराचे Insight Photos

जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत असलेल्या भारतीय मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता असते.

Pravin Dabholkar | Dec 17, 2024, 14:24 PM IST

Most Expensive House: जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत असलेल्या भारतीय मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता असते.

1/14

भारतातील सर्वात महागडं घर, 27 मजले, 6 लोकांसाठी 600 स्टाफ; अंबानींच्या घराचे Insight Photos

Mukesh Ambani Home Antilia Inside Photos Most Expensive House in World Marathi News

Most Expensive House: जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत असलेल्या भारतीय मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता असते. अंबानी कुटुंबाच्या भव्य समारंभांमध्ये अँटिलिया नेहमीच चर्चेत असते. या घराला देशातील सर्वात महागड्या घराचा दर्जा मिळालाय. जगातील सर्वात उंच एकल कुटुंब इमारत आहे.

2/14

अँटिलिया अनेक अर्थांनी खास

Mukesh Ambani Home Antilia Inside Photos Most Expensive House in World Marathi News

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी लक्झरी लाइफ जगतात. त्याचे घर अँटिलिया अनेक अर्थांनी खास आहे. या 27 मजली इमारतीबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांना माहित नाहीत.

3/14

राजवाड्यापेक्षा कमी नाही

Mukesh Ambani Home Antilia Inside Photos Most Expensive House in World Marathi News

अंबानींचे घर अँटिलिया एखाद्या शाही महालापेक्षा कमी नाही. आपण अँटिलियामधील काही खास फोटो आणि त्याच्याशी संबंधित काही तथ्ये जाणून घेऊया. जी तुम्हाला कदाचित माहीतही नसतील.

4/14

मुकेश आणि नीता अंबानी यांचे घर

Mukesh Ambani Home Antilia Inside Photos Most Expensive House in World Marathi News

मुकेश आणि नीता अंबानी यांचे घर अँटिलिया हे देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या घरांपैकी एक आहे. दक्षिण मुंबईत असलेल्या अँटिलियाची रचना एका अमेरिकन आर्किटेक्चर फर्मने केली आहे.

5/14

दुसरी सर्वात महाग निवासी मालमत्ता

Mukesh Ambani Home Antilia Inside Photos Most Expensive House in World Marathi News

अंटीलिया जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी निवासी मालमत्ता म्हणून ओळखली जाते. अँटिलिया ही जगातील सर्वात उंच एकल कुटुंब इमारत आहे.

6/14

27 मजल्यांची अँटिलिया

Mukesh Ambani Home Antilia Inside Photos Most Expensive House in World Marathi News

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 27 मजले असलेल्या अँटिलियामध्ये प्रत्येक मजला अतिरिक्त उंचीवर ठेवण्यात आला आहे. ज्यामुळे ही इमारत 60 मजली इमारतीइतकी उंच आहे.

7/14

तीन हेलिपॅड

Mukesh Ambani Home Antilia Inside Photos Most Expensive House in World Marathi News

अँटिलिया 8 रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंप सहन करू शकते. कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन अँटिलियामध्ये तीन हेलिपॅडही बांधण्यात आले आहेत.

8/14

6 मजली पार्किंग

Mukesh Ambani Home Antilia Inside Photos Most Expensive House in World Marathi News

अँटिलियाच्या खाली पहिले 6 मजले पार्किंगसाठी आहेत. ज्यामध्ये एकाच वेळी 168 कार पार्क केल्या जाऊ शकतात. पार्किंगच्या वरच्या मजल्यावर एक 50 सीटर सिनेमा हॉल बांधला आहे आणि त्याच्यावर आऊटडोअर गार्डन आहे.

9/14

आईस्क्रीम पार्लर

Mukesh Ambani Home Antilia Inside Photos Most Expensive House in World Marathi News

अंबानी कुटुंबाच्या या आलिशान घरात 9 लिफ्ट आहेत. घरात स्पा आणि मंदिरही आहे. याशिवाय योग स्टुडिओ, आईस्क्रीम पार्लर आहे. घरात तीनहून अधिक इनडोअर आणि आउटडोअर स्विमिंग पूल आहेत. यात थिएटर, 80 पाहुण्यांसाठी जागा आहे.

10/14

घराच्या आतून दिसते समुद्राचे सुंदर दृश्य

Mukesh Ambani Home Antilia Inside Photos Most Expensive House in World Marathi News

घराच्या आतून समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. अँटिलियाच्या दिवाणखान्याची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की नैसर्गिक प्रकाशामुळे येथे खूप छान लुक येतो.

11/14

आईस्क्रीम पार्लर आणि स्नो रूम

Mukesh Ambani Home Antilia Inside Photos Most Expensive House in World Marathi News

या हॉलमध्ये शेकडो पाहुणे बसण्याची क्षमता आहे. 40,000 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या अँटिलियामध्ये एक ओपन पार्क, गार्डन, आइस्क्रीम पार्लर आणि स्नो रूम देखील आहे.

12/14

600 पेक्षा जास्त कर्मचारी

Mukesh Ambani Home Antilia Inside Photos Most Expensive House in World Marathi News

घराच्या सुरक्षेसाठी अँटिलियामध्ये 600 हून अधिक कर्मचारी 250 सुरक्षा रक्षक तैनात आहेत.

13/14

कमळ आणि सूर्य थीम

Mukesh Ambani Home Antilia Inside Photos Most Expensive House in World Marathi News

15 व्या शतकात सापडलेल्या अँटे-ल्ला बेटावरून अँटिलिया हे नाव देण्यात आले आहे. घराची रचना कमळ आणि सूर्याच्या थीमवर करण्यात आली आहे.

14/14

16000 कोटी रुपये

Mukesh Ambani Home Antilia Inside Photos Most Expensive House in World Marathi News

अंबानींचे हे ड्रीम होम बांधण्यासाठी 4 वर्षे लागली. घरात प्रवेश करण्यासाठी पूजा 10 दिवस चालू होते. देशाच्या विविध भागातून पंडित आले होते. जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक असलेल्या अँटिलियाची किंमत अंदाजे 16000 कोटी रुपये आहे, जी काळानुसार वाढतच चालली आहे.