मुकेश अंबानींनी स्वतःला दिलं 12620602500 रुपयांचं लक्झरी गिफ्ट, भारतातील सर्वात महागडी...

  फोर्ब्सच्या मते, मुकेस अंबानी यांच्याकडे 9.2 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. अंबानी परिवार देशात हायप्रोफाइल वस्तू खरेदीसाठी ओळखला जातो. त्यामुळे महागडी वस्तू खरेदी त्यांच्यासाठी तशी नवी नाही.

| Oct 14, 2024, 18:28 PM IST

Mukesh Ambani Boeing 737 Max 9:  फोर्ब्सच्या मते, मुकेस अंबानी यांच्याकडे 9.2 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. अंबानी परिवार देशात हायप्रोफाइल वस्तू खरेदीसाठी ओळखला जातो. त्यामुळे महागडी वस्तू खरेदी त्यांच्यासाठी तशी नवी नाही.

1/8

मुकेश अंबानींनी स्वतःला दिलं 12620602500 रुपयांचं लक्झरी गिफ्ट, भारतातील सर्वात महागडी...

Mukesh Ambani BBJ 737 Max 9 new private jet Tech Marathi News

Mukesh Ambani Boeing 737 Max 9: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांनी त्यांच्या कलेक्शनमध्य आणखी एक लक्झरी संपत्ती जोडली आहे. बिझनेस टायकून अंबानी यांनी भारतातील पहिले बोईंग 737 मॅक्स 9 खरेदी केले आहे. इतके महागडे खाजगी जेट  भारतीय कोणत्याच उद्योगपतीच्या मालकीचे नाही.

2/8

9.2 लाख कोटी रुपयांची संपत्ती

Mukesh Ambani BBJ 737 Max 9 new private jet Tech Marathi News

फोर्ब्सच्या मते, मुकेश अंबानी यांच्याकडे 9.2 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. अंबानी परिवार देशात हायप्रोफाइल वस्तू खरेदीसाठी ओळखला जातो. त्यामुळे महागडी वस्तू खरेदी त्यांच्यासाठी तशी नवी नाही.

3/8

बोईंग 737 मॅक्स 9 खरेदी

Mukesh Ambani BBJ 737 Max 9 new private jet Tech Marathi News

मुकेश अंबानी यांनी बोईंग 737 मॅक्स 9 खरेदी केले आहे. ज्याची किंमत $118.5 दशलक्ष  म्हणजे अंदाजे रु. 987 कोटी रुपये इतकी आहे. कस्टम रिसर्च आणि रेट्रोफिटिंगनंतर कथितरित्या याची किंमत 1 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.

4/8

बोईंग 737 मॅक्स 9 ची वैशिष्ट्ये

Mukesh Ambani BBJ 737 Max 9 new private jet Tech Marathi News

बोईंग 737 मॅक्स 9, त्याच्या उत्कृष्ट श्रेणी आणि आरामासाठी ओळखले जाते, एक प्रशस्त केबिन आणि त्याच्या पूर्ववर्ती बोईंग मॅक्स 8 पेक्षा मोठ्या मालवाहू क्षमतेचा दावा करते. दोन CFMI LEAP-1B इंजिनसह सुसज्ज, जेट एकाच प्रवासात 6,355 नॉटिकल मैल (11,770 किमी) चे प्रभावी अंतर पार करू शकते. वेग, लक्झरी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या संयोजनामुळे ते जागतिक स्तरावर सर्वोच्च खाजगी विमानांपैकी एक बनले आहे.

5/8

अंबानींचे जेट कलेक्शन वाढतय

Mukesh Ambani BBJ 737 Max 9 new private jet Tech Marathi News

अंबानींच्या खासगी जेटच्या ताफ्यात आणखी प्रभावशाली जेटची भर पडली आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे आधी नऊ जेट विमाने आहेत. ज्यात एक Bombardier Global 6000, दोन Dassault Falcon 900 आणि Embraer ERJ-135 यांचा समावेश आहे. लक्झरी विमानाची आवड असल्याने मुकेश अंबानींचं कलेक्शन खूप मोठं आहे. बोईंग 737 मॅक्स 9 हाय कॅटेगरीत येते.

6/8

लवकरच मुंबईतील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुख्यालयात

Mukesh Ambani BBJ 737 Max 9 new private jet Tech Marathi News

मुकेश अंबानींच्या बोईंग 797 मॅक्स 9 मध्ये बोईंग 737 मॅक्स 9 मॉडेल वापरण्यात आले. यात 2 CFMI LEAP-1B इंजिन आहेत. हे बोईंग 6,355 समुद्री मैल (11,770 किमी)कॅटेगरीमध्ये येते. याची किंमत 1,000 कोटींहून अधिक (दुरुस्तीसह) असल्याचे म्हटले जाते. सध्या हे विमान दिल्ली विमानतळावर उभे असून ते लवकरच मुंबईतील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुख्यालयात पोहोचण्याची शक्यता आहे.

7/8

6,234 किमीचे अंतर 9 तासांत

Mukesh Ambani BBJ 737 Max 9 new private jet Tech Marathi News

भारतात येण्यापूर्वी अंबानींच्या बोईंग 737 मॅक्स 9 मध्ये स्वित्झर्लंडमधील युरोएअरपोर्ट बेसल-मुलहाउस-फ्रीबर्ग येथे मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले होते. विमानाचा आतील भाग अंबानीच्या गरजेनुसार तयार करण्यात आला. 27 ऑगस्ट रोजी बासेल ते दिल्लीपर्यंतचा शेवटचा प्रवास करण्यापूर्वी त्याने स्वित्झर्लंड आणि यूकेमध्ये 6 चाचणी उड्डाणे पूर्ण केली. 6,234 किलोमीटरचे अंतर केवळ नऊ तासांत पार केले.

8/8

19 जण प्रवास

Mukesh Ambani BBJ 737 Max 9 new private jet Tech Marathi News

मुकेश अंबानी यांचे खाजगी जेट अतिशय आरामदायी आहे. यामधून 19 जण प्रवास करू शकतात. या जेटच्या खिडक्या सामान्य विमानाच्या खिडक्यांपेक्षा 20 टक्के मोठ्या असतात. त्यामुळे बाहेरचे दृश्य स्पष्टपणे दिसते.