मुकेश अंबानींनी आकाशला विचारला एक प्रश्न; तिथूनच सुरू झाली 'रिलायन्स जिओ'ची कहाणी

अशी झाली जिओ रिलायन्सची सुरूवात 

| Dec 24, 2020, 11:04 AM IST

मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानीची (Nita Ambani) ची तीन मुलं. इशा आणि आकाश अंबानी ही जुळी मुलं तर अनंत अंबानी हा या दोघांपेक्षा ३ वर्षांनी लहान. इशा (Isha Ambani) आणि आकाश (Akash Ambani) दोघं रिलायन्स जिओ (Reliance Jio)ची जबाबदारी सांभाळतात. 

1/8

आकाश अंबानीने एका मुलाखतीत Reliance Jio ही कंपनी कशी सुरू झाली याची गोष्ट सांगितली. मुकेश अंबानी यांनी आकाश अंबानीला ही कंपनी सुरू करण्यासाठी कसं प्रोत्साहन दिलं ते देखील त्याने सांगितलं.   

2/8

आकाश अंबानीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं की, अमेरिकेतील ब्राऊन युनिर्व्हसिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतच राहू इच्छित होता.   

3/8

आकाशला एक दिवस मुकेश अंबानी भेटायला आहे. त्यांनी आकाशला त्याचा व्यवसायाबद्दल काय विचार आहे? असा प्रश्न केला. त्यावर आकाशने आपल्याला अमेरिकेतच राहायचं असं सांगितलं.

4/8

मुकेश अंबानींनी आकाशचं संपूर्ण बोलणं ऐकल्यानंतर दुसरा प्रश्न विचारला की,'तू दिवसभर इंटरनेटवर काय करतोस?' त्यावर तो म्हणाला की,'वाचतो, काही नवीन शिकतो आणि ज्ञानात भर पाडतो.'

5/8

आकाशला अंबानीला उत्तर देताना मुकेश अंबानी म्हणाले की, तुला असं नाही वाटतं की, भारताची सव्वा करोड जनतेने पण हेच करावं. 

6/8

आकाश अंबानीने 'हो' उत्तर दिलं आणि तेथेच 'जिओ टेलिकॉम'चा जन्म झाला. आणि हे सांभाळण्यासाठी आकाशला भारतात बोलावलं. 

7/8

यानंतरच आकाश आणि इशा या दोघांनी जिओची जबाबदारी स्विकारली. 

8/8

जिओ देशातील सर्वात जास्त वापरली जाणारी टेलीकॉम सर्व्हिस प्रोवाडर आहे.