क्रिकेटमधून कोट्यवधी रुपये कमवणारे स्टार खेळाडू करतात सरकारी नोकरी, वाचा संपूर्ण लिस्ट

टीम इंडियाचे स्टार खेळाडू क्रिकेटशिवाय वेगवेगळ्या ब्रॅण्डसोबत केलेल्या करारातून कमाई करत असतात. याशिवाय टीम इंडियातील काही खेळाडू सरकारी नोकरी देखील करत आहेत. आज अशाच काही क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत. 

Jun 05, 2021, 12:03 PM IST
1/5

हरभजन सिंह

हरभजन सिंह

टीम इंडियाचे सर्वोत्तम गोलंदाज हरभजन सिंहचं नाव यादीमध्ये पहिलं येतं. त्याने 700 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना पंजाब पोलीसमध्ये नोकरी मिळाली आहे. पंजाब पोलीसमध्ये डीएपी म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 

2/5

युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहल

कमी वेळात युजवेंद्रने टीम इंडियामध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. लिमिटेड ओव्हर्समध्ये खेळणारा स्पिनर टीम इंडियाची पहिली निवड ही युजवेंद्रची असते. युजवेंद्र चहल इनकम टॅक्स अधिकारी देखील आहे.   

3/5

उमेश यादव

उमेश यादव

गोलंदाजीत वेग वाढल्यामुळे टीम इंडियाला अनेक वेळा विजय मिळविण्यात उमेश यादवने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. उमेशला लहानपणापासून पोलीस किंवा सैन्यात नोकरी करायची होती. त्याचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. 2017मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीआधी त्याला रिझर्व्ह बँकेचा असिस्टन्ट मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली.  

4/5

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

क्रिकेटचा देवमाणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरलाही सरकारी नोकरी आहे. 2010मध्ये सचिनला इंडियन एअऱ फोर्स ग्रूपचा कॅप्टन म्हणून नोकरी मिळाली होती. 

5/5

एमएस धोनी

एमएस धोनी

सर्वांचा आवडता आणि लाडका टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल धोनी. 2015मध्ये भारतीय सैन्य दलात त्याला लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्त करण्यात आलं.माही भारतीय सैन्यदलातील जवानांसोबत वेळ घालवणं खूप जास्त आवडतं