Moto Edge 50 Pro 5G जगातील पहिला AI पॉवर्ड प्रो-ग्रेड कॅमेरा असेलेला फोन; वायरलेस चार्जिंग आणि... कमी किंमतीत जबरदस्त फिचर्स

टोरोलाचा Moto Edge 50 Pro 5G फोन लाँच झाला आहे. जाणून घ्या फोनचे फिचर्स आणि किंमत. 

Apr 03, 2024, 18:47 PM IST

Moto Edge 50 Pro 5G : मोटोरोला (Motorola) कंपनीचा मोस्ट अवटेड Moto Edge 50 Pro 5G  स्मार्टफोन अखेर लाँच झाला आहे. 6.7 इंचाची 1.5k रिझॉल्यूशन्सचा pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.  144 हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळतो. यासह या फोनमध्ये 4500 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 125 वॅट वायर्ड आणि 50 वॅट वायरलेस फास्ट चार्जिंज सपोर्ट मिळतो.

1/7

मोटोरोला कंपनीचा बहुचर्चित Moto Edge 50 Pro 5G  फोन लाँच झाला आहे.  या फोनमध्ये जगातील पहिला AI पॉवर्ड प्रो-ग्रेड कॅमेरा मिळतो. 

2/7

दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन खरेदी करता येईल.  8 GB रॅम, 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. Luxe Lavender, Black Beauty आणि Moonlight Pearl असे कलर ऑप्शन आहेत. तर, 12 GB रॅम, 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 33,999 रुपयांना खरदी करता येईल.   

3/7

या फोनमध्ये  क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेनरेशन 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामुळे स्पीड आणि मल्टीटास्किंग करताना फोन अजिबात हँग होणार नाही.  

4/7

या फोनमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सल मॅक्रो-अल्ट्रा वाईट कॅमेरा तसेच  30x हायब्रिड झूम सपोर्टसह 10MP टेलिफोटो लेन्स असा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.   

5/7

AI पॉवर्ड हे या फोनचे सर्वात खास वैशिष्ट्य आहे. या फोनमध्ये एआय प्रो ग्रैड कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. AI अडेप्टिव्ह स्टॅबलायाझेशन, ऑटो फोकस ट्रॅकिंग, AI फोटो एन्हासमेंट इंजिन आणि टिल्ट मोड सारखे AI पॉवर्ड कॅमेरा फीचर्स मिळणार आहेत. 

6/7

Moto Edge 50 Pro 5G हा फोन  OnePlus Nord CE4 5G,  Realme 12 Pro+ 5G या कंपन्यांच्या फोनला टक्कर देणार आहे.   

7/7

Moto Edge 50 Pro 5G हा एक बजेट फोन आहे. या फोनमध्ये जबरदस्त फिचर्ससह तगडा बॅटरी बॅकअप देखील मिळणार आहे.