जगासमोर श्रीमंत दिसले तरी कर्जात बूडालेले आहेत हे देश , यादीत भारताचासूद्धा समावेश

Most Debt Countries in World: सगळ्हायात जास्त कर्ज घेऊन बसलेला देश दुसरा-तिसरा कोणता नाही तर.... बिलियन अमेरीकी डॉलरच्या आकड्यांत देश बुडलेले आहेत. जगातले सर्वात जास्त कर्जबाजारी झालेले देश, यादी वाचून नक्कीच धक्का बसेल

Sep 10, 2024, 18:18 PM IST
1/7

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टीक्स ने काही दिवसांपुर्वीच जगातल्या कर्जबाजारी देशांची यादी दाखवली आहे. या यादीत असलेल्या देशांची नावे बघून ,डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.  या यादीत नाव खालुन असलेलेच चांगले  प्रथम क्रमांकाचे नाव बघून तर अचंबित व्हाल या देशावर एवढं कर्ज असू शकतं, यावर विश्वासच बसणार नाही.

2/7

ही यादी 2023च्या गोळाबेरीजेवर आधारित आहे.धक्कादायक बाब म्हणजे या यादीत भारताचे नाव सूद्धा आहे.  प्रगतीच्या मार्गावर अग्रगण्य असणाऱ्या या देशाचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. हा देश दुसरा-तिसरा कोणता नाही तर, अमेरिका आहे. अमेरिकेवर 33229 बिलियन अमेरीकी डॉलर एवढं कर्ज आहे.  

3/7

 जगातला दूसऱ्या क्रमांकाचा कर्जबाजारी देश आहे चीन. 14,692 बिलियन अमेरीकी डॉलरचा आकडा चीनच्या डोक्यावर लटकता आहे. कर्ज देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चीनवर एवढं कर्ज असेल असा विचारसुद्धा कोणी केला नसेल. आणि पहिल्या क्रमांकावर चक्क अमेरीकेचे नाव आहे .

4/7

पुढील नावे वाचून अचंबित व्हाल. तिसऱ्या क्रमांकावर अधुनिकतेची ऊंची गाठलेला देश जपान आहे. जपानवर 10,797 बिलियन अमेरीकी डॉलरचे कर्ज आहे. 3,469 बिलियन अमेरीकी डॉलर या अकड्याबरोबर यु.के चौथ्या क्रमांकावर आहे .  

5/7

3,354 बिलियन अमेरीकी डॉलर एवढं कर्ज घेऊन फ्रांस पाचव्या क्रमांकावर आहे. यादीत इटलीचे नाव सहाव्या क्रमांकावर आहे .इटलीवर 3,141 बिलियन अमेरीकी डॉलर एवढे कर्ज आहे.

6/7

काही दिवसांपुर्वीच एका अहवालात नमूद केले होते की ,भारताच्या विकासाच्या गतिपेक्षा भारताची कर्जबाजारी होण्याची गती फारच जास्त आहे.भारताचा कर्जाचा आकडा वाढतचं चालला आहे.सातव्या स्थानावर भारतातचे नाव आहे. भारतावर 3,057 बिलियन अमेरीकी डॉलर एवढे कर्ज आहे. भारताचे नाव यादीत खाली असले तरी एकंदरीत स्थिती बघता येत्या काही वर्षात नाव नक्कीच वर येऊ शकते.  

7/7

यादीतपुढे आठव्या क्रमांकावर जर्मनी आहे , तर नवव्यावर कॅनडा . वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टीक्सने दिलेल्या या यादीत दहाव्या क्रमांकावर ब्राझील आहे.