PHOTO: लाल चिखल आणि हिरवगार शेत... कोकणातील सर्वात सुंदर दृष्य

Konkan Tourism : कोकण म्हणजे स्वर्ग... कोणत्याही ऋतुमध्ये कोकण सुंदर दिसतो. पावसाळा सुरु झाला की कोणकणाचं निसर्ग सौंदर्य आणखीच बहरतं. पावासळ्यात होणाऱ्या  पारंपारिक शेतीमुळे कोकणच्या निसर्गसौंदर्याला चार चाँंद लागतात.    

| Jul 11, 2024, 17:14 PM IST
1/7

कोकणात चांगलाच पाऊस झाल्यामुळे शेतीची कामं आता अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे सध्या शेतातल्या बांधावर शेतकरी भात शेतीची लावणी करताना दिसून येत आहेत. 

2/7

कोकणात सुरू असलेल्या या शेतीचे ड्रोन व्हिडीओ टिपले आहेत संगमेश्वरमधील अभिषेक खातू यांनी.   

3/7

भात शेती हा कोकणातील लोकांचा पारंपारिक व्यवसाय आहे.    

4/7

एकीकडे लाल चिखल आणि दुसरीकडे हिरवगार शेतं... हे दृष्य डोळ्यांचे पारण फेडतं.

5/7

पावसाळ्यात कोकणात सर्वत्र पारंपारिक पद्धतीने भात शेती केली जाते.   

6/7

पावसाळ्यामध्ये कोकणचं सौंदर्य अधिक फुलतं पण त्याच वेळेला कोकणात लाल चिखलात सुरू असलेली शेती एक वेगळंच समाधान देऊन जाते.   

7/7

एका बाजूला हिरवा परिसर तर दुसऱ्या बाजूला डोंगर रांगांमध्ये होत असलेली शेतीची कामे, जोडीला बांधावर बसून भाकर खाण्याची मजा काही औरच.