270 पैकी 180 चित्रपट फ्लॉप तरीही बॉलिवुडचा सुपरस्टार बनला 'हा' अभिनेता; एका वर्षात रिलीज झाले होते 19 सिनेमे

सर्व चित्रपट फ्लॉप होऊनही बॉलिवुडचा सुपरस्टार ठरलेला अभिनेता कोण आहे जाणून घेऊया.

वनिता कांबळे | Sep 30, 2024, 20:27 PM IST

Mithun Chakraborty : बॉलिवुडचा एक असा अभिनेता आहे ज्याचे एका वर्षात 19 सिनेमे प्रदर्शित झाले होते. या अभिनेत्याचे 270 पैकी 180 चित्रपट फ्लॉप झाले. तरीही हा अभिनेता बॉलिवुडचा सुपरस्टार बनला. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया.

1/7

चित्रपट फ्लॉप होऊनही बॉलिवुडचा सुपरस्टार  ठरलेला हा अभिनेता 40 वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत आहे.   

2/7

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय.. सिनेविश्वातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. 8 ऑक्टोबरला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.  

3/7

मिथुनने 'मृगया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'डिस्को डान्सर' चित्रपट हिट झाल्यानंतर मिथुनचे नाव बॉलिवुडच्या बड्या स्टार्सच्या यादीत सामील झाले. 

4/7

मिथुनने 1989 मध्ये सलग 19 चित्रपट केले होते. त्याच्या या रेकॉर्डची नोंद  'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये झाली आहे. 

5/7

एक काळ असा होता की मिथुनचे एकापाठोपाठ एक असे सलग 30 चित्रपट सुपरफ्लॉप झाले. मिथुनच्या 270 पैकी 180 चित्रपट फ्लॉप ठरले. 

6/7

मिथुनने आपल्या चित्रपट कारकिर्दीत 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.  

7/7

चित्रपट फ्लॉप होऊनही  सुपरस्टार  ठरलेला हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूडचा 'डिस्को डान्सर' मिथुन चक्रवर्ती आहे.