Comet EV Price: 'कॉमेट'ची Advance Booking सोमवारपासून; पहिल्या 5 हजार ग्राहकांना स्वस्तात मिळणार कार

MG Comet EV Price: एमजी हेक्टर कंपनीच्या कॉमेट या इलेक्ट्रीक कारच्या बुकींगला सोमवारपासून सुरुवात होत आहे. कंपनीने यानिमित्ताने पहिल्या 5 हजार ग्राहकांसाठी विशेष सवलतीची घोषणा केली आहे. पहिल्या 5 हजार ग्राहकांना स्वस्तात ही कार खरेदी करता येणार आहे. नेमकी किती आहे या कारची किंमत, तिचे फिचर्स काय आहेत पाहूयात...

| May 12, 2023, 18:08 PM IST
1/10

Comet EV Price

एमजी हेक्टर कंपनीची नॅनो अशी ओळख असलेल्या कॉमेट या इलेक्ट्रीक व्हेइकलच्या प्री बुकींगला सोमवारपासून म्हणजेच 15 मे 2023 पासून सुरुवात होत आहे. कंपनीने पहिल्या 5 हजार ग्राहकांसाठी विशेष ऑफर लागू केली आहे. (सर्व फोटो - एमजी हेक्टरच्या वेबसाईटवरुन साभार)  

2/10

Comet EV Price

बिग इनसाइड, कॉम्पॅक्ट आऊटसाईड अशी जाहीर केली जात असलेली कॉमेट या भन्नाट इलेक्ट्रीक कारची घोषणा एमजी हेक्टरने काही महिन्यांपूर्वी केली होती.

3/10

Comet EV Price

एमजी हेक्टरची ही इलेक्ट्रीक कार एका चार्जींगमध्ये 230 किमीपर्यंतचा प्रवास करु शकते. या गाडीच्या चार्जींगचा खर्च 519 रुपये प्रती महिना इतका असल्याचा कंपनीचा दावा आहे.

4/10

Comet EV Price

कॉमेटमध्ये प्रिसमॅटीक सेल बॅटरी देण्यात आली असून या बॅटरीला आयपी 67 रेटींग आहे. तसेच ही गाडी ऑटोमॅटीक असून तिच्यामध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.

5/10

Comet EV Price

गाडीमध्ये फ्लोटींग ट्वीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये वायरलेस अ‍ॅण्ड्रॉइड आणि अ‍ॅपल कायप्ले कनेक्टीव्हीटी देण्यात आली आहे. गाडीमध्ये डिजीटल की शेअरींगचाही पर्याय कंपनीने दिला आहे.

6/10

Comet EV Price

कॉमेट गाडीमध्ये पुढे 2 एअरबॅक्स देण्यात आल्या आहेत. तसेच मुलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेणारी यंत्रणा गाडीत आहे. गाडीमध्ये टायर प्रेशर मॉनेटरिंग सिस्टीमही देण्यात आली आहे. गाडीत एकूण 15 सेल्फी फिचर्स देण्यात आले आहेत.

7/10

Comet EV Price

गाडीला 3 वर्षांची किंवा 1 लाख किमीपर्यंतच्या प्रवासाची वॉरंटी देण्यात आली आहे. 3 वर्षांपर्यंत कंपनीकडून मोफत रोड साईड असिस्टंटची सेवा पुरवली जाणार आहे. तसेच बॅटरीची वॉरंटी ही 8 वर्ष किंवा 1.2 लाख किमीपर्यंतच्या प्रवासाची आहे.

8/10

Comet EV Price

3.3 किलो व्हॅटची घरी चार्ज करता येणारी बॅटरी कॉमेट गाडीमध्ये आहे. तसेच चार्जींगसंदर्भात कंपनीकडून विशेष सेवाही पुरवली जाणार आहे.

9/10

Comet EV Price

सोमवारपासून एमजीमोटो डॉट को डॉट इन या वेबसाईटवर आणि कंपनीच्या शोरुममध्ये कॉमटेची बुकींग सुरु होणार आहे. मात्र पहिल्या 5 हजार ग्राहकांसाठी कंपनीने विशेष ऑफर दिली आहे.

10/10

Comet EV Price

गाडीची किंमत ही 7.98 लाखांपासून 9.98 लाखांपर्यंत आहे. 7.78 लाखांना बेस व्हेरिएट, 9.28 लाखांना मीड रेंज व्हेरिएंट आणि 9.98 लाखांना गाडीचं टॉप व्हेरिएंट उपलब्ध आहेत. मात्र पहिल्या 5 हजार ग्राहकांसाठीच या किंमती लागू असती. यानंतर गाडीची किंमत मागणीनुसार पुन्हा वाढवली जाऊ शकते असं सांगण्यात आलं आहे. (सर्व फोटो - एमजी हेक्टरच्या वेबसाईटवरुन साभार)