18 व्या वर्षी प्रियंका चोप्रा Miss World झाली, तेव्हा निक जोनस काय करत होता माहितीये का? सासूनेच केला खुलासा

Priyanka Chopra : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही आता अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न करून तिथेच सेट झाली आहे. ते दोघं त्यांच्या मुलीसोबत लॉस एनजेलिसला राहतात. त्यांच्या मुलीसोबतच अनेक फोटो प्रियांका सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. निक आणि प्रियांकाची लव्ह स्टोरी ही खूप हटके आहे. पण तुम्हाला माहितीये का प्रियांका आणि निकमध्ये जवळपास 11 वर्षांचा फरक आहे. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का जेव्हा प्रियांकानं मिस वर्ल्डचा खिताब जिंकला होता तेव्हा 7 वर्षांच्या निकनं तिला पाहिलं होतं. 

| May 12, 2023, 17:53 PM IST
1/7

प्रियांकाच्या सासूनं तिला पाहिले होते.

priyanka chopra, nick jonas,

प्रियांकानं नुकतीच गायिका आणि अभिनेत्री जेनिफर हडसनच्या शोवर हजेरी लावली होती. त्यावेळी गप्पा मारताना प्रियांका म्हणाली, मी तेव्हा 18 वर्षांची होती आणि त्यावेळी मी लंडनला मिस वर्ल्डचा खिताब जिंकला होता. तेव्हा तिच्या सासुनं तिला पाहिले होते. 

2/7

प्रियांकाच्या सासुनं तिला सांगितली होती ही स्टोरी

priyanka chopra, nick jonas,

प्रियांकाच्या सासुनं तिला सांगितले की 'मी तुला तो खिताब जिंकताना पाहिले होते हे मला आठवण आहे. तर मी म्हणाले ही 2000 सालची गोष्ट आहे. तेव्हा मी लंडनला होते आणि तुम्ही टेक्सेसमध्ये  तर हे शक्यच नाही. त्यावर त्यांनी मला सांगितले की नोव्हेंबरचा महिना होता आणि 7 वर्षांचा निक एका ब्रॉडवे शोवर होता आणि निकचे भाऊ 8-9 वर्षांचे होते.'

3/7

सात वर्षांच्या निकनं प्रियांकाला जिंकताना पाहिलं

priyanka chopra, nick jonas,

प्रियांकाच्या सासऱ्यांना इव्हेंट्स पाहणं पसंत आहे. ते हा कार्यक्रम देखील पाहत होते आणि त्यावेळी सात वर्षांचा निक आला आणि त्या दोघांनी तुला जिंकताना पाहिलं. 

4/7

या सगळ्या कहाणीवर प्रियांका म्हणाली...

priyanka chopra, nick jonas,

मला वाटतं हे होणारचं होतं कारण या छोट्याशा आयुष्यात जे होतं ते यासाठीच होतं की या सगळ्यामुळे आपल्या आठवणी जोडलेल्या राहतील आणि त्याच आठवणी आपण पुढे सगळ्यांना सांगत राहू. आता ते सगळं आमचं वर्तमान आहे याचा आनंद आहे. 

5/7

2018 साली केलं लग्न

priyanka chopra, nick jonas,

प्रियांका आणि निक या दोघांनी दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2018 साली लग्न केलं. त्यांच्या लग्नाला आता चार वर्षे झाली आहे. 

6/7

सरोगसीच्या मदतीनं झाले पालक

priyanka chopra, nick jonas,

सरोगसीच्या मदतीनं निक आणि प्रियांका 2021 साली आई-वडील झाले. त्यांच्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनस असे आहे. 

7/7

प्रियांका सिटाडेलमुळे आहे चर्चेत

priyanka chopra, nick jonas,

प्रियांका ही सध्या तिच्या सिटाडेल या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून त्याचा दर आठवड्याला म्हणजेच शुक्रवारी एक एपिसोड प्रदर्शित होतो. (All Photo Credit : Priyanka Chopra Instagram)