फक्त 4.99 लाखांत खरेदी करा 'ही' इलेक्ट्रिक कार, एका चार्जिंगमध्ये मुंबईहून थेट सातारा गाठा

MG Motor India ने नुकतंच सुरु करण्यात आलेल्या बॅटरी ऐज-अ-सर्व्हिस (BaaS) प्रोग्रामला एक्स्टेंड करत यामध्ये आपली एंट्री लेव्हल कॉमेट EV आणि ZS EV ला सहभागी केलं आहे.   

| Sep 21, 2024, 19:27 PM IST

MG Motor India ने नुकतंच सुरु करण्यात आलेल्या बॅटरी ऐज-अ-सर्व्हिस (BaaS) प्रोग्रामला एक्स्टेंड करत यामध्ये आपली एंट्री लेव्हल कॉमेट EV आणि ZS EV ला सहभागी केलं आहे. 

1/8

MG Motor India ने नुकतंच सुरु करण्यात आलेल्या बॅटरी ऐज-अ-सर्व्हिस (BaaS) प्रोग्रामला एक्स्टेंड करत यामध्ये आपली एंट्री लेव्हल कॉमेट EV आणि ZS EV ला सहभागी केलं आहे.   

2/8

काय आहे BaaS प्रोग्राम?

काय आहे BaaS प्रोग्राम?

एमजी मोटरने BaaS प्रोग्रामला नुकतंच लाँच केलेल्या MG Windsor सह सादर केलं आहे. या प्रोग्राममध्ये कारच्या किंमतीत बॅटरीचा समावेश होत नाही.   

3/8

ग्राहकांना प्रती किमीच्या हिशोबाने बॅटरीची किंमत भरावी लागते. ज्यामुळे कारची किंमत फार कमी होते.   

4/8

या युनिक प्रोग्रामच्या माध्यमातून ग्राहक MG Comet EV ला फक्त 4.99 लाखांत खऱेदी करु शकतात. यामध्ये बॅटरीच्या किंमतीचा समावेश नसेल.   

5/8

या प्रोग्राम अंतर्गत MG Comet EV च्या ग्राहकांना बॅटरीसाठी एका किमीसाठी 2.5 रुपये भाडं भरावं लागेल.   

6/8

तसंच आता MG ZS EV ची सुरुवातीची किंमत 13.99 लाख रुपये करण्यात आली आहे. यासाठी बॅटरीचं भाडं 4.5 रुपये प्रती किमी आहे.   

7/8

कारबद्दल बोलायचं गेल्यास MG Comet मध्ये 17.3kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार सिंगल चार्जमध्ये 230 किमीचा प्रवास करेल.   

8/8

तसंच ZS EV मध्ये कंपनीने 50.3 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. जो सिंगल चार्जमध्ये 461 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते.