Coconut Oil: हिवाळ्यात खोबरेल तेल घट्ट झालाय? या ट्रिक्स वापरून वितळून घ्या

जरा थंडी पडली की हिवाळ्यात खोबरेल तेल लगेच गोठते. अशा स्थितीत त्याला वितळवण्यासाठी काय करायचे हे जाणून घेऊयात. 

| Nov 27, 2024, 13:56 PM IST

Winter Tips: जरा थंडी पडली की हिवाळ्यात खोबरेल तेल लगेच गोठते. अशा स्थितीत त्याला वितळवण्यासाठी काय करायचे हे जाणून घेऊयात. 

1/7

हिवाळा सुरु झाला आहे. सगळीकडेच गुलाबी थंडी आली आहे. यातच अनेक पदार्थ या थंड वातावरणामुळे गोठत आहेत. यातील एक पदार्थ म्हणजे खोबरेल तेल. 

2/7

जरा थंडी पडली की हिवाळ्यात खोबरेल तेल लगेच गोठते. अशा स्थितीत जर तुम्ही हिवाळ्यात खोबरेल तेल वापरत असाल तर ते पाण्यात ठेवून वितळवू घेऊ शकता. गरम पाण्यात खोबरेल तेलाची बाटली  ठेवा. यामुळे बाटलीमध्ये जमा झालेले तेल सहज वितळेल.  

3/7

गोठलेले खोबरेल तेल वितळण्याचा अजून एक सोपा मार्ग म्हणजे हेअर ड्रायरचा वापर. तुमच्याकडे हेअर ड्राय असल्यास, खोबरेल तेलाच्या बाटलीच्या तोंडातुन   ड्रायरमधून गरम हवा घाला. यामुळे तेल कोणत्याही त्रासाशिवाय सहज तेल वितळेल.   

4/7

हिवाळ्यात खोबरेल तेल गोठण्यापासून रोखू शकता. कोरफड  जेल किंवा इतर कोणतेही नॉन-फ्रीझिंग तेल खोबरेल तेलात मिसळा. यामुळे तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय संपूर्ण हिवाळ्यात खोबरेल तेल वापरू शकता. हे खोबरेल तेल घट्ट होण्यापासून प्रतिबंधित करेल.  

5/7

वरती सांगितलेले सगळे उपाय तुम्ही घरी सहज करू शकता.   

6/7

डोंगराळ आणि थंड भागात खोबरेल तेल गोठण्यापासून रोखण्यासाठी, शास्त्रज्ञांनी काम केले आहे. यानंतर खोबरेल तेल ५ अंश सेल्सिअस तापमानातही गोठणार नाही, असे काही चाचण्यांमध्ये आढळून आले आहे.  

7/7

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)