FB-Instagram साठीचा सब्सक्रिप्शन प्लान लाँच; किती पैसे भरावे लागणार?

Facebook Verification Service: सोशल नेटवर्किंग साईट्स, फेसबुक आणि इन्स्टाग्रामही आता म्हणे Subscription basis वर काम करणार आहे. 

Mar 20, 2023, 10:42 AM IST

FB-Instagram : एखाद्या सोशल नेटव्हर्किंग साईटचं तुमच्याआमच्या आयुष्यात किती महत्त्व? असा प्रश्न विचारला असता, खूप... हे एका शब्दातील उत्तर तुम्ही द्याल. 

1/6

meta verification

Meta launched facebook instagram Verification subscription Service

विरंगुळ्यापासून ते अगदी महत्त्वाच्या कामांपर्यंत या माध्यमांचा जगाच्या पाठीवर अनेकणजण वापर करतात. 

2/6

meta

Meta launched facebook instagram Verification subscription Service

काहीजणांना तर या माध्यमांचं व्यसनच असतं. आता म्हणे हेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत. 

3/6

meta facebook

Meta launched facebook instagram Verification subscription Service

ट्विटरमागोमाग आता मेटानंही पेर वेरिफिकेशन सर्विस लाँच केली आहे. शुक्रवारी, अमेरिकेत या नव्या सुविधेची सुरुवात झाली. ज्या माध्यमातून Facebook आणि Instagram युजर्सना पेड वेरिफिकेशन मिळणार आहे.  

4/6

meta news

Meta launched facebook instagram Verification subscription Service

या सुविधेमुळं युजर्सना 'ब्लू बॅज' मिळणार असून, यासाठी त्यांना 11.99 रुपये म्हणजेच 990 रुपये भरावे लागणार आहेत. प्रतीमाह असणारी ही रक्कम वेब वर्जनपुरता लागू असेल. 

5/6

meta update

Meta launched facebook instagram Verification subscription Service

अँड्रॉईड आणि Apple iOS साठी युजर्सना 14.99 म्हणजेच 1240 रुपये इतका खर्च येईल. अमेरिकेआधी ही सर्व्हिस ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरु करण्यात आली होती.   

6/6

facebook verification

Meta launched facebook instagram Verification subscription Service

यापूर्वी Snapchat आणि Telegram नंही पेड सर्व्हिस लाँच केली होती. सोप्या शब्दांत सांगावं तर, या नव्या माध्यमातून मेटा अर्थार्जनाच्या एका नव्या वाटेवर चालू लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही.