चिंता ही चितेसमान! नकारात्मक विचार आणि भितीमुळं शरीरातील 'या' अवयवांचे होते नुकसान

आजच्या काळात लहान मुलांपासून ते थोरापर्यंत कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा तणाव घेतलेला पाहायला मिळतो. तसं पाहायला गेलं तर ताण-तणाव हे सामान्य आहे. मात्र अतिप्रमाणात ताण घेतल्यास आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. 

Apr 11, 2024, 15:55 PM IST

आजच्या काळात लहान मुलांपासून ते थोरापर्यंत कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा तणाव घेतलेला पाहायला मिळतो. तसं पाहायला गेलं तर ताण-तणाव हे सामान्य आहे. मात्र अतिप्रमाणात ताण घेतल्यास आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. 

1/7

चिंता चितेसमान! नकारात्मक विचार आणि भितीमुळं शरीरातील 'या' अवयवांचे होते नुकसान

mental health what can anxiety and stress do to your body

 एखाद्या व्यक्तीला स्वतःला भावनिक दृष्ट्या सांभाळू शकत नाही आणि मानसिकदृष्ट्या खचून जातो. कामाच्या ठिकाणी त्रास, अभ्यासाचा तणाव, पैशाचे नियोजन यासारख्या समस्यांमुळं चिंतेने ग्रासला जातो. 

2/7

अतितणाव

mental health what can anxiety and stress do to your body

 अतितणावामुळं मानवाचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य कमजोर होऊ शकते. अतितणावामुळं शरीराचे कोणते नुकसान होऊ शकते, हे जाणून घेऊयात. 

3/7

रोगप्रतिकार शक्ती

mental health what can anxiety and stress do to your body

जर तुम्ही दीर्घकाळापासून तणावात आहात तर त्याचा परिणाम तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवर होऊ शकतो. यामुळं सतत सर्दी आणि तापामुळं आजारी पडू शकतात. स्ट्रेस हार्मोन इम्यून सिस्टम कमकुवत करते. 

4/7

डिप्रेशन

mental health what can anxiety and stress do to your body

 तणाव आणि चिंता यामुळं भावनिकदृष्ट्या तो व्यक्ती कमजोर होतो. यामुळं डिप्रेशन येऊ शकते. तणावात असलेला व्यक्ती अनेकदा चिंतेत दिसून येतो. त्यामुळं तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. 

5/7

थकवा येणे

mental health what can anxiety and stress do to your body

तणावामुळं शारिरीक लक्षणांमध्ये थकवा येणे हे सुद्धा एक लक्षण आहे. तणावात असलेला रुग्ण थोडंस काम केल्यानेही लगेचच थकतो. त्याव्यतिरिक्त डोकेदुखी, पोटदुखी आणि मांसपेशियांत वेदना या सारख्या समस्या येऊ शकतात. 

6/7

हृदयरोग

mental health what can anxiety and stress do to your body

तणावाच्या काळात तुमच्या हृदयाची गति वाढते. तेव्हा पेशींना सक्रिय राहण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. अशा स्थितीत शरीरातून जास्त रक्त वाहून जाते. ज्यामुळे स्ट्रोक किंवा उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते.

7/7

Disclaimer

mental health what can anxiety and stress do to your body

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)