SRK बरोबर अभिनेत्रींची फौज! Jawan च्या Prevue मध्ये केवळ दीपिका अन् नयनतारा नाही तर...

Women of Shah Rukh Khan Actioner Jawan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा प्रीव्ह्यू सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रीव्ह्यूमध्ये दिसलेल्या शाहरुखच्या भन्नाट लूक्सबरोबरच अभिनेत्री नयनतारा आणि दीपिका पादुकोणचीही सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. मात्र या चित्रपटामध्ये केवळ या दोनच हिरोईन्स नाहीत. या चित्रपटात अनेक अभिनेत्री झळकणार असून जवळजवळ प्रत्येकीची झळक प्रीव्ह्यूमध्ये पहायला मिळाली. या अभिनेत्री कोणत्या हे पाहूयात...

| Jul 12, 2023, 11:42 AM IST
1/11

Meet the women of Shah Rukh Khan actioner Jawan From Nayanthara Sanya Malhotra to Deepika Padukone

अटलीने दिग्दर्शित केलेल्या शाहरुख खानच्या आगामी 'जवान' चित्रपटाचा प्रीव्ह्यू सोमवारी जगासमोर आला. या चित्रपटामध्ये शाहरुखच्या दमदार लूकबरोबर चर्चेत आहेत त्या शाहरुखच्या हिरोईन्स.

2/11

Meet the women of Shah Rukh Khan actioner Jawan From Nayanthara Sanya Malhotra to Deepika Padukone

शाहरुख खान चित्रपटाचा हिरो असेल तर हिरोईनही तशी दमदारच हवी. 'जवान'मध्ये तर शाहरुख अनेक अभिनेत्रींबरोबर झळकणार आहे हे या प्रिव्ह्यूमधून स्पष्ट झालं आहे.

3/11

Meet the women of Shah Rukh Khan actioner Jawan From Nayanthara Sanya Malhotra to Deepika Padukone

प्रीव्ह्यूच्या सुरुवातीलाच 'बाहुबली'प्रमाणे एका बाळाला उचलून घेतल्याचा सीन दाखवण्यात आला आहे. हा सीन महिलांच्या तुरुंगातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लहानपणापासूनच शाहरुखच्या आयुष्यात महिलांचा फार प्रभाव असल्याचं सूचित करण्यात आलं आहे. 

4/11

Meet the women of Shah Rukh Khan actioner Jawan From Nayanthara Sanya Malhotra to Deepika Padukone

2 मिनिटांच्या या प्रीव्ह्यूमधून या चित्रपटामध्ये केवळ दीपिका पादुकोण आणि नयनतारा दिसणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. 

5/11

Meet the women of Shah Rukh Khan actioner Jawan From Nayanthara Sanya Malhotra to Deepika Padukone

हा प्रीव्ह्यू तुम्ही नीट पाहिला असेल तर या दोघींबरोबरच इतरही अनेक अभिनेत्री या चित्रपटात आहेत. या कोणत्या ते पाहूयात...

6/11

Meet the women of Shah Rukh Khan actioner Jawan From Nayanthara Sanya Malhotra to Deepika Padukone

'जवान' चित्रपटाध्ये मुख्य भूमिकेमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आहे. नयनताराचा हा हिंदीमधील पहिलाच चित्रपट ठरणार आहे.

7/11

Meet the women of Shah Rukh Khan actioner Jawan From Nayanthara Sanya Malhotra to Deepika Padukone

दीपिका पादुकोणही या चित्रपटामध्ये दिसणार असून तिला या प्रीव्ह्यूमध्ये पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

8/11

Meet the women of Shah Rukh Khan actioner Jawan From Nayanthara Sanya Malhotra to Deepika Padukone

नयनताराशिवाय 'जवान'मध्ये आणखीन एक दाक्षिणात्य चेहरा दिसणार आहे. हा चेहरा म्हणजे 'कॉमन मॅन' फेम अभिनेत्री प्रियमणी. 

9/11

Meet the women of Shah Rukh Khan actioner Jawan From Nayanthara Sanya Malhotra to Deepika Padukone

तसेच आपल्या आगळ्यावेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत असलेली सानया मल्होत्राही शाहरुखबरोबर 'जवान' चित्रपटामध्ये दिसणार आहे.

10/11

Meet the women of Shah Rukh Khan actioner Jawan From Nayanthara Sanya Malhotra to Deepika Padukone

त्याचप्रमाणे शाहरुखच्या या बहुचर्चित चित्रपटामध्ये रिद्धी डोग्राही दिसणार आहे. 

11/11

Meet the women of Shah Rukh Khan actioner Jawan From Nayanthara Sanya Malhotra to Deepika Padukone

शाहरुखचा 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.