याच्या पेक्षा सुंदर ठिकाण दुसरं कुठलचं नाही; पावसाळ्यात इथं जाणाऱ्या प्रत्येकालाचं अस वाटतं

महाराष्ट्रातील हे ठिकाण पावसाळ्यात खुपच सुंदर दिसते. 

| Jun 14, 2024, 00:08 AM IST

Matheran Trek Monsoon : पावसाळा सुरु झाला की सर्वांचा निसर्गाच्या सानिध्यात जावेसे वाटतं. पावसाळ्यात महाराष्ट्राचं सौंदर्य बहरते. हिरवेगार डोंगर आणि डोंगर दऱ्यातून कोसळणारे धबधबे मन मोहून टाकतात. महाराष्ट्रात असे अनेक मान्सून स्पेशल स्पॉट आहे. मात्र, एक असं ठिकाण आहे जे पावसाळ्यात खूपच सुंदर दिसते. याच्या पेक्षा सुंदर ठिकाण दुसरं कुठलचं नाही... पावसाळ्यात  इथं जाणाऱ्या प्रत्येकालाचं अस वाटतं,

1/7

शुद्ध व थंड हवा तसेच दऱ्या-खोऱ्यांमधून दिसणारे विहंगम दृश्य... या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. 

2/7

मुंबईहून बदलापूर-कर्जत रस्त्याने नेरळचा घाटातून माथेरनच्या पायथ्यापर्यंतच आपण वाहनाने  प्रवास करु शकतो. येथे गेल्यावर माथेरान हिल स्टेशनची हद्द सुरु होते. येथे गेल्यावर वाहने पार्क करुन पुढचा प्रवास पायीच करावा लागतो. चालत, ढकलगाडी अथवा घोड्यावर बसून माथेरान मधील विविध ठिकाणांना भेटी देऊ शकतो. मात्र, अनेक पर्यटक पायी चालतच निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात. 

3/7

माथेरानमध्ये अनेक पाईट्स आहेत. इको पॉईंट, लुइसा पॉइंट, चार्लोट झील, मंकी पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, वन ट्री हिल पॉईंट, माथेरान लॉर्ड पॉईंट, माथेरान सनसेट पॉईंट अशा अवनेक ठिकांना भेट देऊ शकता.   

4/7

सह्याद्रीच्या पर्वतरांगां मध्ये  2600 फुट उंचीवर वसलेल्या माथेरान शहरात वाहनांना प्रवेश नाही. माथेरान हिल स्टेशन समुद्र सपाटीपासून सुमारे 803 मीटर उंचीवर आहे. 

5/7

पावसाळ्यात माथेरानचे सौंदर्य अधिकचं खुलून दिसते. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य पाहणे म्हणजे स्वर्ग सुखचं म्हणावे लागेल.    

6/7

चोहीकडे हिरवळ, डोंगरांमधून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे आणि समोरचं माणुसही दिसणार नाही इतकं दाट धुकं असा नजारा इथं पहायला मिळतो.  

7/7

 हे ठिकाण म्हणजे माथेरान... माथेरान हे महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील लोकप्रिय हिल स्टेशन आहे.