महाराष्ट्रातील गारेगार हिलस्टेशन ; इथं गेल्यावर AC, कूलर, पंखा कशाचीच गरज पडणार नाही

Tourists Place :अगदी एक दिवसातही तुम्ही माथेरानला फिरुन येवू शकता. येथे जाण्यासाठी खर्चही अगदी कमी येईल.  

वनिता कांबळे | May 25, 2024, 22:35 PM IST

Matheran Hill Station Trip : दिवाळीपासून सुट्ट्यांचा हंगाम सुरु होतो. अनेकजण  आपल्या बजेट नुसार वेकेशन प्लान करतात. वेळ आणि बजेट कमी असेल तर मुंबईजवळ एकदम मस्त ठिकाण आहे. मुंबईजवळ असलेल्या या ठिकाणी महाबळेश्वरचा फिल येईल. येथे तुम्ही 2 हजारमध्ये सिक्रेट ट्रीप प्लान करु शकता. हे ठिकाण म्हणजे माथेरान.

1/7

मुंबईपासून अगदी तासाभराच्या अंतरावर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. हजारो पर्यटक येथे निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येत असतात.

2/7

 प्रवासाठी 500 रुपये तर निवास आणि खाण्यापिण्यासह साधारण दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत खर्च येवू शकतो.  शनिवार रविवार असं विकेंडला माथेरानला जाण्याचा प्लान करु शकता. 

3/7

इको पॉईंट, सनसेट पाईंट, वन ट्री पॉईंट, मंकी पाईंट असे अनेक अप्रतिम व्ह्यू पॉइंट येथे आहेत. 

4/7

मध्य रेल्वेने नेरळ स्टेशनला उतरुन टॉय ट्रेन किंवा शेअर टॅक्सीने माथेरानच्या गेटपर्यंत जाता येते. तिथून पुढे मात्र, पायीच संपूर्ण माथेरान फिरावे लागते.   

5/7

सर्वात सुंदर आणि आकर्षक असे हे हिल स्टेशन निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. हे समुद्रसपाटीपासून साधारणता 2600 फूट इतक्या उंचीवर आहे. 

6/7

डोंगराच्या कुशीत वसलेले हे महाराष्ट्रातील सर्वात लहान हिल स्टेशन आहेत.  

7/7

 माथेरानला मिनी महाबळेश्वर म्हणून देखील ओळखले जाते.