Mahindra, Tata, Hyundai सगळे पडले फिके; 6.49 लाखांच्या कारचा मार्केटमध्ये धुमाकूळ, तब्बल 32 KM चा मायलेज अन् भरभरुन फिचर्स

भारतीय बाजारपेठेत नेहमीच हॅचबॅक कारची मागणी असते. हॅचबॅक सेगमेंटमध्ये गेल्या काही महिन्यात अनेक नव्या कार लाँच झाल्या आहेत. पण यात मारुती सुझुकी बाजी मारत आहे.     

Shivraj Yadav | Oct 11, 2024, 18:52 PM IST

भारतीय बाजारपेठेत नेहमीच हॅचबॅक कारची मागणी असते. हॅचबॅक सेगमेंटमध्ये गेल्या काही महिन्यात अनेक नव्या कार लाँच झाल्या आहेत. पण यात मारुती सुझुकी बाजी मारत आहे. 

1/9

भारतीय बाजारपेठेत नेहमीच हॅचबॅक कारची मागणी असते. हॅचबॅक सेगमेंटमध्ये गेल्या काही महिन्यात अनेक नव्या कार लाँच झाल्या आहेत. पण यात मारुती सुझुकी बाजी मारत आहे.   

2/9

नुकतंच मारुती सुझुकीने बाजारात आपली प्रसिद्ध हॅचबॅक कार Maruti Swift च्या फोर्थ जनरेशन मॉडेलला लाँच केलं होतं.   

3/9

लाँचनंतर कारने भारतीय बाजारपेठेत अक्षरश: धुमाकूळ घातला असून, सप्टेंबर महिन्यात देशातील सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे.   

4/9

सप्टेंबर महिन्यात या कारच्या 16,241 युनिट्सची विक्री झाली आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या 14,703 युनिट्सच्या तुलनेत ही 10 टक्के जास्त आहे.   

5/9

फक्त 6.49 लाखांपासून सुरु होणाऱ्या Swift ला कंपनीने सीएनजी व्हेरियंटमध्ये सादर केलं आहे. हिची किंमत 8.20 लाखांपासून सुरु होते.   

6/9

यामध्ये नवं 1.2 लीटर क्षमतेचं Z सिरीजचं इंजिन वापरण्यात आलं आहे. याचं पेट्रोल व्हेरियंट 25.72 किमी/लीटर आणि सीएनजी व्हेरियंट 32 किमी/किग्रॅचा मायलेज देतं.   

7/9

कारच्या इंटिरिअरला स्मार्ट लूक देण्यात आला आहे. याचं केबिन Fronx शी मिळतं जुळतं आहे. यामध्ये फ्री स्टँडिंग इंफोटेंमेंट सिस्टम, नव्या स्टाइलचे सेंटर एअर-कॉन वेंट्स दिले आहेत.   

8/9

नव्या स्विफ्टमध्ये कंपनीने 9 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, मागील भागात एसी वेंट्स, पुश बटण स्टार्ट-स्टॉप, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल सारखे फिचर्स दिले आहेत.   

9/9

या कारला आधीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यात आलं आहे. याच्या सर्व व्हेरियंट्समध्ये 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोलही मिळतो.