Gauri Puja Ukhane in Marathi : गौराईसमोर फुगड्या घालताना घ्या मराठमोळे उखाणे, एका दमात घ्याल तर शप्पथ!

Sep 11, 2024, 17:09 PM IST
1/8

खणखण कुदळी, मणमण माती  चितरल्या भीती, उभरलं खांब  आतीबाईच्या पोटी, जन्मले राम  राम नाही म्हटले, नाव नाही घेतले  बत्तीस सुपाऱ्या, बत्तीस पानं  बत्तीस पानांचा केला विडा  भरल्या सभेत खायाच कसा  कानीच्या बुगड्या, पडल्या उघड्या  पायच्या इरुद्या, मारते फेक ... रावांचे नाव घेते, खेडेकरांची लेक   

2/8

जीन जीन जिन्यात, उभी होतो मेन्यात  कंचळुई अंगात, चंदूर भांगात  लवंगा मुठीत, जायफळ वाटीत  सोन्याची केली, उघडली खोली  खोलीत होते सात हंडे,  हंड्यावर परात, परातीत भाग,  भातावर तूप, तूपासारखे रूप रुपासारखा जोडा उठा उठा भरतारांना मग पंढरीला जावा चहा केली नेऊन दिली चिवडा केला ताजा,  भरतारांच नाव घ्यायला पहिला नंबर माझा...   

3/8

  कॉपी बांगडी, सव्वा रुपये डझन अस भरतात सज्जन नाव घेते मज्जन  कन्हेरी बांगडी, तन्हेरी तास .... कपड्यांना नेहमी अत्तराचं साज  

4/8

गौरीचे गोंडे  गणेशाची वाकडी सोंड  गणेशावर लाडू उठा शंकर जेवायला वाडू  शंकराचं ताट  दसरा आला गजर गाठ  दसऱ्याचं सोन, आलं दिवाळीचं टोन दिवाळीच पाणी, संक्रात आली तान्ही  सक्राईचा ओवसा, नव्याच पुण्यामध्ये गवसं  पुनवच्या लोंबी, शिवरात्रीने घेतल्या जोंभी  शिवरात्रीच्या वरने, शिमग्यान धरली धरणं  शिमग्याची होळी, शिपन्याने दिली आरोळी  शिपन्याचा रंग, पाडवा आला चकरदंत  पाडव्याची गुढी, आकेतीन ढोकली उडी  आकेतीच आळं, बेंदराची कासे फळं,  बेंदराचं बैल, पंचमीचा ऐतीलफैल  पंचमीचा नाग, नागाच पोतं  भरताराचं नाव घेते, श्रावण भाद्रपत पावतं...   

5/8

6/8

पेरूच्या बागेत पेरु आले गमतीला ... रावांचे नाव घेते सवसनांच्या जमतीला

7/8

काचेच्या बशीत चकचक दही ... भरतारांच्या अंगठीवर माझी सही

8/8

उभी होतो अंगणात नजर गेली आकाशात, भरतारांच नाव घेते भारताच्या नकाशात