स्कायरुफ, 6 Airbags, ADAS अन्... महिंद्राची नवी धमाकेदार कार! किंमत फक्त 7.49 लाख; पाहा फिचर्स

Mahindra XUV 3XO Price Features Specifications: ज्या प्राइज रेंजमध्ये महिंद्राने आपली नवीन गाडी बाजारात उतरवली आहे ते पाहता ही गाडी नक्कीच अनेक एक्सयुव्ही गाड्यांना तगडं आव्हान देणार असं स्पष्ट होत आहे. या गाडीचे एकूण 6 व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहेत. एकूण 8 रंगसंगतीमध्ये ही कार उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जाणून घेऊयात या कारची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स...

| Apr 30, 2024, 09:49 AM IST
1/11

Mahindra XUV 3XO Price Features Specifications

कारनिर्मिती क्षेत्रातील भारतामधील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या महिंद्राने एक नवीन एक्सयूव्ही लॉन्च केली आहे. 'एक्सयूव्ही थ्री एक्स ओ' (XUV 3XO) असं या गाडीचं नाव असून परवडणाऱ्या किंमतीत ही गाडी लॉन्च करण्यात आली आहे.  

2/11

Mahindra XUV 3XO Price Features Specifications

'एक्सयूव्ही थ्री एक्स ओ'च्या एमएक्स वन मॉडेलची किंमत अवघ्या 7 लाख 49 हजारांपासून (एक्स-शोरुम प्राइज) सुरु होत आहे. या गाडीच्या टॉप-एण्ड एएक्स सेव्हन एल मॉडेलची किंमत 13 लाख 99 हजार रुपये (एक्स-शोरुम प्राइज) इतकी आङे. कंपनीने या गाडीसाठीची बुकिंग सुरु केली आहे. लवकरच या गाडीची डिलीव्हरीही सुरु केली जाणार आहे.  

3/11

Mahindra XUV 3XO Price Features Specifications

XUV 3XO चे एकूण 6 व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये MX1, MX2 Pro, MX3, AX5, AX5L आणि AX7L व्हेरिएंटचा समावेश आहे. कंपनीने या कारमध्ये 8 रंगाचे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.  

4/11

Mahindra XUV 3XO Price Features Specifications

XUV 3XO मध्ये रेग्युलर हेडलाइट सेटअप, बंम्पर आणि ग्रिल, रिअर कनेक्टींग टेल लाइट्स, रिअर क्वार्टर पॅनलमध्ये आकर्षक रचना, 17 इंचांचे एलॉय व्हील, पॅनारॉमिक ग्लास रुफ यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत. गाडीमध्ये एलईडी डीआरएलही देण्यात आलेत.  

5/11

Mahindra XUV 3XO Price Features Specifications

XUV 3XO च्या अंतर्गत भागांमध्ये कोणतेही बदल नाहीत. XUV400 EL Pro (EV) मध्ये असेच इंटिरिअर पाहायला मिळालेलं. XUV 3XO मध्ये 10.25 इंचांची प्रि-स्टॅण्डिंग इन्फोटेन्मेंट स्क्रीन देण्यात आली आहे. यात वायरलेस एण्ड्रॉइड, अॅपल कार प्ले सुविधा देण्यात आली आहे. एड्रेनॉक्स कनेक्टिव्हिटी, 10.2 इंचांची फूल डिजीटल टीएफटी इन्स्ट्रूमेंट स्क्रीन, ऑडिओ सिस्टीम देण्यात आला आहे.   

6/11

Mahindra XUV 3XO Price Features Specifications

XUV700 पेक्षा सरस स्टेअरिंग व्हील, रियर एसी व्हेंट, रियर यूएसबी पोर्ट, वायरलेस चार्जिंग, ब्लाइंड-व्हू मॉनिटरिंग 360 डिग्री कॅणेरा आणि लेव्हल 2 ADAS सिस्टीम देण्यात आली आहे. भारतामध्ये बी सेगमेंट वाहनांमध्ये लेव्हल-2 ADAS दिलं जातं. यामध्ये 10 वैशिष्ट्ये आहेत. ADAS हे सुरक्षा यंत्रणेचा एक प्रकार आहे.

7/11

Mahindra XUV 3XO Price Features Specifications

XUV 3XO मधील लेव्हल-2 ADAS मध्ये फॉरवर्ड कोलिजन वार्निंग, स्मार्ट पायलट असिस्ट, अडेप्टिव क्रूज कंट्रोल, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वार्निंग, ट्रॅफिक साइन रिकॉग्निशन आणि हाय बीम असिस्टसारखे फीचर्स देण्यात आले आहे.  

8/11

Mahindra XUV 3XO Price Features Specifications

कारमध्ये ड्युअल-पॅन पॅनोरमिक सनरूफ देण्यात आला आहे. याला कंपनीने स्कायरुफ असं म्हटलं आहे. यात ड्युएल-झोन क्लाइमेट कंट्रोल सिस्टम देण्यात आली आहे. यासाठी प्रोजेक्टर एलीमेंटबरोबर ऑल-एलईडी लाइटिंग, लेदरेट अपहोल्स्ट्री, फ्रंट आणि रियर आर्मरेस्ट, कूल्ड ग्लोवबॉक्स, ऑटो-डिमिंग IRVM, ऑटो हेडलाइट्स, रेन-सेंसिंग वाइपर आणि बऱ्याच गोष्टी देण्यात आल्या आहेत.

9/11

Mahindra XUV 3XO Price Features Specifications

लेवल-2 ADAS बरोबरच 6 एअरबॅग, ऑल 4-डिस्क ब्रेक, सीट बेल्ट रिमाइंडर, 5-स्टार क्रॅश सेफ्टी रेटींग, ABS, EBD, हिल असिस्ट, TPMS, TCS सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.  

10/11

Mahindra XUV 3XO Price Features Specifications

महिंद्राने XUV 3XO मध्ये 1.2 लीटर 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर 4-सिलेंडर टर्बो डीजल इंजनचे पर्याय दिले आहेत, XUV 3XO पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 130PS ची सर्वाधिक पॉवर जनरेट होते. तर हे इंजिन 230nm चं टॉर्क निर्माण करतं। तर कमी क्षमतेचं इंजिन 112ps की पॉवर आणि 200nm का टॉर्क निर्माण करतं. 1.5 लीटर 4-सिलेंडर टर्बो डीझेल इंजन 116ps ची ऊर्जा आणि 300nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.  

11/11

Mahindra XUV 3XO Price Features Specifications

महिंद्रा XUV 3XO 4.4 सेकंदात में 0 ते 60 किमी/तास वेग पकडू शकते. गेअरबॉक्स ऑप्शनबद्दल बोलायचं झाल्यास 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड AMT आणि नवीन 6-स्पीड आयसिन सोर्स्ड टॉर्क कनवर्टर देण्यात आला आहे.