Mahindra ने दिला सगळ्यांनाच दणका, 7 सीटर कारमध्ये सर्वाधिक विक्री, Ertiga-Innova फक्त पाहत राहिले

Car Sales February 2023: कुटुंब मोठं असेल तर गाडीही मोठी असावी अशी अपेक्षा असते. अशा कुटुंबांमध्ये सात सीटर गाड्यांना फार मागणी असते. या श्रेणीत Maruti Ertiga आणि Toyota Innova यांनी बराच काळ वर्चस्व गाजवलं. दरम्यान महिंद्राच्या दोन गाड्यांनी Ertiga ला मागे टाकलं असून सात सीटरमध्ये सर्वाधिक विक्री (Best Selling 7 Seater) होणाऱ्या गाड्या ठरल्या आहेत.   

Mar 21, 2023, 20:55 PM IST
1/6

Best Selling 7 Seaters car:  भारतात एकत्र कुटुंबपद्दती असल्याने गाडी घेतानाही संपूर्ण कुटुंब सामावेल अशी गाडी घेण्याकडे कल असतो. यामुळेच भारतात सीत सीटर गाड्यांना मोठी मागणी आहे. टोयोटा इनोव्हा (Toyota Innova) आणि मारुति अर्टिगा (Maruti Ertiga) यांनी ग्राहकांची चांगली पसंती असून, त्यांनी या श्रेणीत वर्चस्व गाजवलं आहे. दरम्यान आता महिंद्रा मात्र त्यांना येथे मागे टाकताना दिसत आहे. याचं कारण म्हणजे महिंद्राच्या दोन गाड्यांनी Maruti Ertiga ला मागे टाकलं आहे. तसंच सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार ठरल्या आहेत.   

2/6

Mahindra Bolero: फेब्रुवारी महिन्यात महिंद्रा बोलेरोच्या 9782 युनिट्सची विक्री झाली आहे. या गाडीने स्कॉर्पिओ-एन आणि मारुती सुझुकी अर्टिगा यांना मागे टाकलं आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत विक्रीत 11 टक्के घसरण झाली आहे. मात्र अशातही ही गाडी सात सीटरच्या यादीत पहिल्या स्थानी आहे.   

3/6

Mahindra Scorpio: फेब्रुवारी 2023 मध्ये 6950 युनिट्सच्या विक्रीसह महिंद्रा स्कॉर्पिओ सर्वाधिक विक्री होणारी दुसरी गाडी ठरली. फेब्रुवारी 2022 च्या तुलनेत विक्रीत 166 टक्के वाढ दिसत आहे.   

4/6

Maruti Suzuki Ertiga: फेब्रुवारी महिन्यात मारुती सुझुकी इर्टिगाच्या 6472 युनिट्सची विक्री झाली असून तिसऱ्या स्थानी राहिली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये इर्टिगाच्या 11 हजार 649 युनिट्सची विक्री झाली होती. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत विक्रीत 44 टक्के घट झाली आहे.   

5/6

Kia Carens: किआ कॅरेन्स चौथी सर्वाधिक विक्री होणारी सात सीटर कार आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये 6248 युनिट्सवची विक्री झाली. 2022 मधील फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत विक्रीत 22 टक्के वाढ आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये 5109 युनिट्स विकले गेले होते.   

6/6

Mahindra XUV700: महिंद्रा एक्सयूवी 700 ने 4505 युनिट्सच्या विक्रीसह 9 टक्के वाढ दर्शवली आहे. यासह भारतात विक्री होणाऱ्या सात सीटर कारच्या यादीत ती पाचव्या स्थानी पोहोचली आहे.