बंदुकीच्या गोळ्याच काय, बॉम्ब टाकला तरी काही होणार नाही; Mahindra ARMADO जवानांचे रक्षण करणार
महिंद्रा ग्रुपने लाँच केलेले हे भारतातील पहिले आर्मड वाहन आहे. हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे चिलखती वाहन आहे. याचा वापर भारतीय सैन्यासाठी केला जाणार आहे.
Mahindra ARMADO : देशातील सुप्रसिद्ध कॉर्पोरेट ग्रुप महिंद्राने भारतीय लष्कराला एक मोठी भेट दिली आहे. महिंद्रा ग्रुपने Mahindra ARMADO आर्माडो हे नवीन आर्मर्ड वाहन लाँच केले आहे. हे वाहन भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल झाले आहे. या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे बंदुकीच्या गोळ्याच काय, बॉम्ब टाकला तरी या वाहनाला काहीच होणार नाही. हे वाहन जवानांचा शत्रुपासून बचाव करेल.
1/6
2/6
3/6
6/6