महिंद्राची दमदार एन्ट्री! खूपच कमी किंमतीत लाँच झाली 5 दरवाजांची Thar Roxx, धमाल फिचर्स

महिंद्रा अॅण्ड महिंद्राने खूप मोठ्या काळानंतर थार रॉक्स लॉंच केली आहे. महिंद्रा थार रॉक्सची किंमत बेस मॅन्युअलसाठी 12.99 लाख रुपयांपासून सुर होतेय.  बेस डीझेल मॅन्यूअलची किंमत 13.99 लाखापासून सुरु होते. या सर्व एक्स शोरुम किंमती आहेत. 

Pravin Dabholkar | Aug 15, 2024, 10:42 AM IST

Mahindra Thar Roxx:महिंद्रा अॅण्ड महिंद्राने खूप मोठ्या काळानंतर थार रॉक्स लॉंच केली आहे. महिंद्रा थार रॉक्सची किंमत बेस मॅन्युअलसाठी 12.99 लाख रुपयांपासून सुर होतेय.  बेस डीझेल मॅन्यूअलची किंमत 13.99 लाखापासून सुरु होते. या सर्व एक्स शोरुम किंमती आहेत. 

1/7

महिंद्राची दमदार एन्ट्री! खूपच कमी किंमतीत लाँच झाली 5 दरवाजांची Thar Roxx, धमाल फिचर्स

Mahindra 5  Door Thar Roxx Launched Features Price Pics Tech Marathi News

Mahindra Thar Roxx:महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राने खूप मोठ्या काळानंतर थार रॉक्स लॉंच केली आहे. महिंद्रा थार रॉक्सची किंमत बेस मॅन्युअलसाठी 12.99 लाख रुपयांपासून सुर होतेय.  बेस डीझेल मॅन्यूअलची किंमत 13.99 लाखापासून सुरु होते. या सर्व एक्स शोरुम किंमती आहेत. 

2/7

टेलगेट-माऊंटेड स्पेअर व्हील

Mahindra 5  Door Thar Roxx Launched Features Price Pics Tech Marathi News

2024 महिंद्रा थार रॉक्समध्ये नवे ग्रिल, सी आकाराचे एलईडी डीआरएल, प्रोडेक्टर हेडलॅंप, गोलाकार फॉग लाइट, ड्युअल टोन एलॉय व्हील आणि रियर-डोर-माऊंटेड हॅंडल देण्यात आले आहे. आधीप्रमाणे यामध्ये रेक्टॅंग्युलर एलईडी टेललाइट्स आणि टेलगेट-माऊंटेड स्पेअर व्हील देण्यात आले आहेत.

3/7

टर्बो-पेट्रोल इंजिन

Mahindra 5  Door Thar Roxx Launched Features Price Pics Tech Marathi News

थार रॉक्समध्ये 2.0 लीटरचे 4 सिलेंडर, mStallion टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. जो 160bhp आणि 330Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय 2.2 लीटर, 4 सिलिंडर, mHawk डीझेल इंजिनदेखील उपलब्ध आहे. जे 150bhp आणि 330Nm टॉर्क जनरेट करते. ग्राहकांना 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्समध्ये पर्याय मिळणार आहेत. 

4/7

महिंद्रा थार रॉक्स फिचर्स

Mahindra 5  Door Thar Roxx Launched Features Price Pics Tech Marathi News

थार रॉक्समध्ये नवे 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम, वायरलेस अॅप्पल कारप्ले आणि एंड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, डिजिटल कलर इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वेंटिलेटेड फ्रंड सीट्स, पॅनोरमिक सनरुफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर एसी वेंट आणि ड्युअल-टोन अपहोल्स्ट्री सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 

5/7

सेस्टीसाठी लेवल 2 ADAS

Mahindra 5  Door Thar Roxx Launched Features Price Pics Tech Marathi News

महिंद्रा थार रॉक्समध्ये सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. गाडीमध्ये लेवल-2 ADAS सूट देण्यात आलाय. यामध्ये 4 डिस्क ब्रेक, 6 एअरबॅग, TCS, TPMS आणि ESP ची सुविधा देण्यात आली आहे.

6/7

ऑफ रोड प्रवास

Mahindra 5  Door Thar Roxx Launched Features Price Pics Tech Marathi News

ऑफ रोड प्रवासासाठी महिंद्रा क्रॉल स्मार्ट असिस्ट (CSA) आणि इंटेली टर्न असिस्ट (ITA) सोबतच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लॉक होणारे रियर डिसरेंस देण्यात आले आहेत. 

7/7

या गाड्यांशी होणार स्पर्धा

Mahindra 5  Door Thar Roxx Launched Features Price Pics Tech Marathi News

थार रॉक्सची स्पर्धा हुंडई क्रेटा, किआ सेल्टोस, होंडा एलिवेट, एमजी एस्टोर, मारुती ग्रेंट विटारा आणि टोयोटा हायडरसारख्या कार्ससोबत होईल.