Mahashivratri 2024 Special : शिवलिंगावर जल कधी अर्पण करु नये? काय सांगत शास्त्र

Mahashivratri 2024 :  8 मार्चला महाशिवरात्रीच व्रत ठेवण्यात येणार आहे. महाशिवरात्री आणि सोमवारी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण केलं जातं. 

Mar 04, 2024, 10:17 AM IST
1/7

धार्मिक शास्त्रानुसार भगवान महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण केलं जातं. त्यामुळे महादेव प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे. 

2/7

शिवाय धार्मिक शास्त्रात शिवलिंगावर जल कधी अर्पण करु नये याबद्दलही सांगण्यात आलं आहे. प्रत्येक शिव भक्ताला हा नियम माहिती हवा. 

3/7

हिंदू धर्मात शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. अशी मान्यता आहे की जल आणि बेलपत्र हे महादेवाला प्रिय आहेत. 

4/7

धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगावर पहाटे 5 ते 11 या वेळेत जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. 

5/7

शिवपुराणानुसार सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जल अर्पण करु नये. त्याच बरोबर शिवलिंगाची सजावट करुन जल अर्पण करणे वर्ज्य मानले जाते. 

6/7

मात्र महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात महादेवाला सूर्यास्तानंतरही जल अर्पण करु शकता. 

7/7

शास्त्रानुसार असं सांगण्यात आलंय की, सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करु नये. कारण कोणतीही पूजा ही सूर्याच्या साक्षीने करावी असं म्हणतात. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)