आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तुम्ही जर पेट्रोल किंवा डिझेल भरायला जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आज महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे.    

| Mar 04, 2024, 09:38 AM IST
1/7

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

2/7

आज क्रूड प्रति बॅरल $80.19 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $83.83 वर व्यापार करत आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी इंधनाच्या दरात बदल झाला आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील आजचे दर जाणून घ्या...

3/7

महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात 96 पैशांनी तर डिझेलच्या दरात 92 पैशांनी वाढ झाली आहे.

4/7

मुंबईसारख्या शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. 

5/7

पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.70 रुपये तर डिझेलचा दर 93.19 रुपये प्रतिलिटर आहे.

6/7

नाशिकमध्ये पेट्रोल 106.56 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर 93.07 रुपये प्रतिलिटर आहे.

7/7

नागपुरात पेट्रोलचा दर 106.06 रुपये तर डिझेलचा दर 92.61 रुपये प्रतिलिटर आहे.