Maharashtra Weather : राज्यात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता

Maharashtra Weather : राज्यात  पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  (Meteorological Department)  या जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.

Apr 01, 2023, 10:15 AM IST

.

1/6

Maharashtra Weather : पुन्हा एकदा राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  (Meteorological Department) राज्यात आजपासून पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहिल. तसेच काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 6 एप्रिल ते गुरुवार 9 एप्रिल पर्यंतच्या चार दिवसात सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातील बुलडाणा, वर्धा आणि नागपूर हे जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.

2/6

मुंबई जवळील अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात पावसाच्या जोरदार सरी झाल्यात.सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मुंबईत वातावणात काहीसे ढगाळ दिसून येत आहे.

3/6

अमरावतीच्या धारणीत अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली असून, झाडे जमीनदोस्त झाली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार काल अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरात संध्याकाळी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

4/6

वादळी वाऱ्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची दणादाण उडाली तर अनेक विद्युत पोल हे पूर्णतः कोसळले असून मोठं मोठ्या झाडांची पडझड झालीय. अचानक आलेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. धारणी शहरात मोठं नुकसान झालं असून काढणीला आलेला गहू पूर्णपणे शेतात भिजलाय. 

5/6

या जिल्ह्यात वातावरणात बदल

 या जिल्ह्यात वातावरणात बदल

महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकणातील चार जिल्हे यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात वातावरणात बदल दिसून येईल.

6/6

तापमानात वाढ होण्याची शक्यता

तापमानात वाढ होण्याची शक्यता

दरम्यान, 2 एप्रिलपासून दुपारच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या 15 दिवसापर्यंत म्हणजे 15 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेय.