महाराष्ट्रात आचारसंहिता लागू! जाणून घ्या 'या 10 गोष्टी; निर्बंध, शिक्षा आणि बरचं काही...

 आचारसंहिता लागू असताना कोणकोणत्या कामांवर बंदी घालण्यात येते? आचारसंहिता मोडल्यास कोणती कारवाई केली जाते ते जाणून घेऊया.

| Oct 16, 2024, 19:59 PM IST

Aachar Sanhita: आचारसंहिता लागू असताना कोणकोणत्या कामांवर बंदी घालण्यात येते? आचारसंहिता मोडल्यास कोणती कारवाई केली जाते ते जाणून घेऊया.

1/10

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू! जाणून घ्या 'या 10 गोष्टी; निर्बंध, शिक्षा आणि बरचं काही...

Maharashtra Vidhan Sabha Election What is Aachar Sanhita code of conduct Details

What is code of conduct: महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच राज्यात आचारसंहितादेखील लागू झाली आहे. जी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर संपेल. या काळात म्हणजेच निवडणूक कालावधीत निवडणूक आयोगाची जबाबदारी वाढते. त्यांना अनेक अधिकारही मिळतात. आचार संहिता म्हणजे काय? या काळात नेमकं काय होतं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

2/10

कोणकोणत्या कामांवर बंदी?

Maharashtra Vidhan Sabha Election What is Aachar Sanhita code of conduct Details

आचारसंहिता लागू झाल्यानंतरच्या काळात निवडणूक आयोग राजकीय पक्षांपासून प्रशासनापर्यंत प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतात. आचारसंहिता लागू असताना कोणकोणत्या कामांवर बंदी घालण्यात येते? आचारसंहिता मोडल्यास कोणती कारवाई केली जाते ते जाणून घेऊया.

3/10

आचारसंहिता काय आहे?

Maharashtra Vidhan Sabha Election What is Aachar Sanhita code of conduct Details

कोणतीही निवडणूक निष्पक्ष आणि मुक्तपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. या नियमांना आचारसंहिता म्हणतात. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते, जी निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहते. राजकीय पक्ष, सरकार आणि निवडणुकीत सहभागी होणाऱ्या प्रशासनासह सर्व अधिकृत विभागांशी संबंधित सर्वांनी आचारसंहितेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते.

4/10

निवडणूक आयोगाची जबाबदारी

Maharashtra Vidhan Sabha Election What is Aachar Sanhita code of conduct Details

निवडणूक आयोगाचे अनेक नियम आणि जबाबदाऱ्या आहेत. ज्यांवर निवडणूक आयोग लक्ष ठेवतो. उदाहरणार्थ, कोणत्याही राज्यात निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी, एखादा अधिकारी त्याच जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असेल किंवा त्याच्या पदस्थापनेला तीन वर्षे पूर्ण झाली असतील, तर त्याची त्या जिल्ह्यातून बदली करावी लागते. 

5/10

पोलीस अधिकाऱ्यांनाही

Maharashtra Vidhan Sabha Election What is Aachar Sanhita code of conduct Details

हा नियम डीईओ, आरओ, एआरओ, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि त्यावरील पदांच्या अधिकाऱ्यांना लागू आहेत. तसेच, निवडणूक आचारसंहितेशी थेट संबंध असलेल्या अधिकाऱ्यांची त्यांच्या गृहजिल्ह्यांमध्ये नियुक्ती केली जात नाही. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी प्रशासनासह राज्यांना भेटी देतात.

6/10

आचारसंहितेत कोणत्या गोष्टीला बंदी?

Maharashtra Vidhan Sabha Election What is Aachar Sanhita code of conduct Details

निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या कामांवर बंदी घालण्यात येईल, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यानुसार आचारसंहिता लागू झाल्यानंतर केंद्र किंवा राज्य सरकारकडून कोणत्याही नवीन योजना किंवा नवीन घोषणा करता येणार नाहीत. निवडणुकीच्या तयारीसाठी सरकारी वाहन, बंगला, विमान इ. अशा सरकारी संसाधनांचा वापर करता येणार नाही.

7/10

आधी परवानगी घ्या

Maharashtra Vidhan Sabha Election What is Aachar Sanhita code of conduct Details

आचारसंहिता लागू होताच, भिंतींवर लिहिलेल्या सर्व पक्षीय घोषणा आणि प्रचार साहित्य काढून टाकण्यात येते. होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्सही काढले जातात. राजकीय पक्षांना रॅली, मिरवणुका किंवा सभांसाठी परवानगी घ्यावी लागते.

8/10

धार्मिक स्थळांचा वापर नको

Maharashtra Vidhan Sabha Election What is Aachar Sanhita code of conduct Details

निवडणुकीत धार्मिक स्थळांचा वापर करता येत नाही.मतदारांना कोणत्याही प्रकारे लाच देता येत नाही. लाच देऊन मते मिळवता येत नाहीत.कोणत्याही उमेदवारावर किंवा पक्षावर वैयक्तिक हल्ले करता येत नाही.मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहने दिली जाऊ शकत नाहीत.मतदानाच्या दिवशी आणि 24 तास आधी मद्य कोणालाही वाटू नये.

9/10

नियम मोडणाऱ्यांवर काय कारवाई?

Maharashtra Vidhan Sabha Election What is Aachar Sanhita code of conduct Details

आचारसंहिता लागू होताच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सरकारी कर्मचारी निवडणूक आयोगाचे कर्मचारी बनतात. आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच ते काम करतात. यासोबतच निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनांचे पालन होत असल्याची खात्रीही ते करतात.

10/10

नियम तोडणाऱ्या उमेदवाराविरुद्ध एफआयआर

Maharashtra Vidhan Sabha Election What is Aachar Sanhita code of conduct Details

जर कोणी या नियमांचे पालन केले नाही, किंवा त्यांचे उल्लंघन करताना आढळल्यास, निवडणूक आयोग त्याच्यावर कारवाई करू शकते. उमेदवाराला निवडणूक लढविण्यापासून रोखू शकते. नियम तोडणाऱ्या उमेदवाराविरुद्ध एफआयआर नोंदविला जाऊ शकतो. दोषी आढळल्यास त्याला शिक्षा होऊ शकते.तसेच तुरुंगातही जावे लागू शकते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x