'महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला दिशा दाखवली...' रवींद्र धंगेकरांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
Maharashtra Politics : कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. सलग 28 वर्षं भाजपच्या ताब्यात असलेला कसब्यासारखा मतदारसंघ जिंकल्यानं आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना दहा हत्तींचं बळ आलंय. कसब्याची विधानसभा पोटनिवडणूक (Kasba By Election) जिंकल्यानं महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास वाढलाय. रवींद्र धंगेकर यांचा 9 मार्चाला शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी धंगेकर यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. काँग्रेस, शिवसेना नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या.
1/6
कसबा पेठ (Kasbapeth) तब्बल 28 वर्षं भाजपच्या (BJP) ताब्यात असलेला विधानसभा मतदारसंघ. काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) भाजपच्या हेमंत रासनेंना (Hemant Rasane) तब्बल 10 हजार 915 मतांनी पराभूत करून भाजपचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. या विजयानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात धंगेकरांचीच चर्चा सुरु झालीय.
2/6
आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर विरोधक एकत्र झाले तर जिंकू शकतात. 30 वर्षे भाजपाचा बालेकिल्ला भुईसपाट करून रवींद्र धंगेकरांनी आपण जिंकू शकतो हा विश्वास केवळ पुण्याला नाही, तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला दिला. तसेच पुढील दिशा दाखवली, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
3/6
4/6
5/6
6/6