Women's Day: तिच्या हाती ST चं स्टेअरिंग! लालपरीचं सारथ्य करण्यासाठी सज्ज

Maharashtra State Transport ST Bus Women Driver: मागील अनेक दिवसांपासून या महिला वर्धा येथील एसटी आगारामध्ये बस चालवण्याचं प्रशिक्षण घेत असून लवकरच त्या चालक म्हणून रुजू होणार आहेत. या महिलांबद्दल जाणून घेऊयात आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त...

Mar 08, 2023, 12:04 PM IST

Maharashtra State Transport ST Bus Women Driver: मागील अनेक दिवसांपासून या महिला वर्धा येथील एसटी आगारामध्ये बस चालवण्याचं प्रशिक्षण घेत असून लवकरच त्या चालक म्हणून रुजू होणार आहेत. या महिलांबद्दल जाणून घेऊयात आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त...

1/5

ST Bus Women Driver

एसटी महामंडळाच्या लालपरीला चालविण्यासाठी राज्यात महिला चालकांची भरती झाली आहे. राज्यात 438 महिला चालक कार्यरत होणार आहेत. तर वर्ध्यात 6 महिला चालक काही दिवसात औपचारिकरित्या रुजू होत आहे.

2/5

ST Bus Women Driver

नियुक्त झालेल्या या महिला चालकांचे सध्या वर्ध्यात प्रशिक्षण सुरू असून लवकरच हे प्रशिक्षण संपून त्या प्रत्यक्ष चालक म्हणून लालपरीचे स्टेअरिंग सांभाळणार आहे.

3/5

ST Bus Women Driver

महामंडळाच्या लालपरीचे स्टेअरिंग महिला चालकाच्या हाती येणार असल्याने प्रवस्यांना सुखरूप सुरक्षित स्थळी पोहचविण्याचे आव्हान या महिलांना असणार आहे.

4/5

ST Bus Women Driver

वर्धा जिल्ह्यात एसटी आगारात सहा महिला चालक म्हणून नियुक्त झाल्या आहे. राज्यातील विविध भागातून दाखल झालेल्या या महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे.

5/5

ST Bus Women Driver

आजवर एसटीत आरक्षणाच्या सीटवर बसणाऱ्या महिला चक्क बस चालकाच्या सीटवर बसणार असल्याने महिला चालक म्हणून त्या अभिमान व्यक्त करत आहेत. 80 दिवसांचे प्रशिक्षण लवकरच पूर्ण होऊन महिलांच्या हाती स्टेअरिंग येणार आहे.