महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये सर्वांना मोफत आरोग्य सेवा, काय आहे योजना? जाणून घ्या

Free treatment: बाहेरील औषधी रुग्णांस देणे आवश्यक असल्यास आरकेएस अनुदानातून स्थानिकरित्या औषध खरेदी करून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.इसीजी, एक्सरे, सिटी स्कैन, प्रयोगशाळा चाचण्या यांचे शुल्क आकारण्यात येऊ नाही. 

| Aug 13, 2023, 12:05 PM IST

Free Treatment In Hospital:महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोणत्याही आजारासाठी तुम्ही रुग्णालयात गेलात छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैसे भरावे लागायचे.  पण आता सरकारी रुग्णालयांमध्ये पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार आहेत. 

1/8

Maharashtra free treatment for all in hospitals CM Eknath Shinde will inaugurate Program on 15 august

महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये सर्वांना मोफत आरोग्य सेवा, काय आहे योजना? जाणून घ्या

Free Treatment In Hospital:महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोणत्याही आजारासाठी तुम्ही रुग्णालयात गेलात छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैसे भरावे लागायचे.  पण आता सरकारी रुग्णालयांमध्ये पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार आहेत. 

2/8

आरोग्यमंत्र्यांनी केली होती घोषणा

Maharashtra free treatment for all in hospitals CM Eknath Shinde will inaugurate Program on 15 august

15 ऑगस्टपासून या योजनेचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 3 ऑगस्ट रोजीच ही योजना जाहीर केली होती आणि आता ती लागू होणार आहे. यासोबतच उपचारासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

3/8

चाचण्यांचे शुल्क नाही

Maharashtra free treatment for all in hospitals CM Eknath Shinde will inaugurate Program on 15 august

बाहेरील औषधी रुग्णांस देणे आवश्यक असल्यास आरकेएस अनुदानातून स्थानिकरित्या औषध खरेदी करून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच इसीजी, एक्सरे, सिटी स्कॅन, प्रयोगशाळा चाचण्यांचे शुल्क आकारण्यात येणार नाही.

4/8

डिस्चार्ज देताना शुल्क नाही

Maharashtra free treatment for all in hospitals CM Eknath Shinde will inaugurate Program on 15 august

आंतररुग्ण विभागामध्ये दाखल असलेल्या रुग्णास डिस्चार्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात येणार नाही.  

5/8

आधी घेतलेले शुल्क जमा

Maharashtra free treatment for all in hospitals CM Eknath Shinde will inaugurate Program on 15 august

यापूर्वी रुग्णांकडून जमा करण्यात आलेले शुल्क शासन खाती अथवा रुग्ण कल्याण निधीमध्ये जमा करावे आणि त्याबाबतचा लेखाजोखा अपडेट करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. 

6/8

कर्मचाऱ्यांवर कारवाई

Maharashtra free treatment for all in hospitals CM Eknath Shinde will inaugurate Program on 15 august

आरोग्य संस्थेमध्ये शुल्क आकारण्यात आल्याचे आढळल्यास संबधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत.

7/8

अडीच कोटींहून अधिक लोकांना लाभ

Maharashtra free treatment for all in hospitals CM Eknath Shinde will inaugurate Program on 15 august

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, महिला रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि कर्करोग रुग्णालयात हे उपचार पूर्णपणे मोफत असतील. ही सुविधा राज्यातील एकूण 2418 रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना लागू आहे. राज्यातील अडीच कोटींहून अधिक लोकांना याचा थेट लाभ मिळणार असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

8/8

मेडिकल कॉलेजमध्ये पैसे भरावे लागतील

Maharashtra free treatment for all in hospitals CM Eknath Shinde will inaugurate Program on 15 august

मात्र, ही योजना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांना लागू होणार नाही. याचा अर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेण्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागतील, तर इतर सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार पूर्णपणे मोफत असतील. 2019 मध्ये कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व जनतेसाठी मोफत आरोग्य विमा योजना जाहीर केली होती.