PHOTO : शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक ते सत्ता स्थापनेतील सर्वात महत्वाची व्यक्ती एकनाथ शिंदे!

Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीत सर्वात मोठा पक्ष असला आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होत असले तरी सर्वांचं लक्ष फक्त एका व्यत्तीवर आहे. त्याच्याच भूमिकेवर कित्येक नावाजलेल्या नेत्यांचं राजकीय करिअर विसंबून आहे. शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक ते स्ता स्थापनेतील सर्वात महत्वाची व्यक्ती एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवासावर एक नजर टाकूयात. 

| Dec 05, 2024, 17:59 PM IST
1/16

महाराष्‍ट्रात आज (5 डिसेंबर 2024) पुन्‍हा एकदा देवेंद्र पर्वाला प्रारंभ झालाय. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर उपमुख्‍यमंत्री म्‍हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यांना राज्‍यपाल सीपी राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आणि मागील 14 दिवस एकनाथ शिंदे उपमुख्‍यमंत्री होणार का? या चर्चेवर आज अखेर पडदा पडला. मुख्‍यमंत्रीपदाची धुरा संभाळल्‍यानंतर उपमुख्‍यमंत्री होणारे एकनाथ शिंदे हे राज्‍यातील दुसरे नेते ठरलंय. 

2/16

बहिणींचा लाडका भाऊ आणि कॉमन मन अशी एकनाथ शिंदे यांनी तब्बल 2 वर्षे 4 महिने 27 दिवसांचा मुख्यमंत्रीपदाचा मान मिळवला. महायुतीची सत्ता आल्यावरही या एका व्यक्तीमुळे शपथविधी लांबला. एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही आणि आमच्यापैकी कोणावर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्हीदेखील ते स्विकारणार नाही अशी आमची भूमिका आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं. 

3/16

शिवसेना पक्षातील ऐतिहासिक फुटीनंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत त्यांनी महायुतीची सत्तास्थापना केली. 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे नॉट रिचेबल झाले होते. विधानसभेतून ठाणे, मग सुरत, त्यानंतर गुवाहाटी असा प्रवास करत ते मुंबईत परतले होते. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळेल, अशी चर्चा सुरु असताना महायुतीने एकनाथ शिंदे यांना अचानक मुख्यमंत्रीपदी बसवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 ला मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती.

4/16

एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी आज 26 नोव्हेंबर 2024 ला आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा काळ 2 वर्षे 4 महिने 27 दिवसांचा होता. तर महिन्यांचा विचार केल्यास 28 महिने 27 दिवस आणि 125 आठवडे 5 दिवस असा आहे. एकनाथ शिंदे दिवसांचा विचार केल्यास 880 दिवस मुख्यमंत्रीपदी विराजमान होते. पण त्यांचा रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास अद्‍भूतच म्हणायला हवा.

5/16

मुख्यमंत्री म्हणून अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलाय. महिला, उपेक्षित, गरीब, सामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी धाडसाने घेतले. त्यामुळे सामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झालीय.

6/16

महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम दरे तर्फ तांब इथून एकनाथ शिंदे यांचा खडतर प्रवास सुरू झाला. ठाण्यात रिक्षाचालक ते राज्याचा मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करायला होता. शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना गेल्या दहा महिन्यांत अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. 

7/16

विशेषतः सामान्य जनता आणि गोरगरिबांना दिलासा मिळेल, अशा योजना त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर राबविल्या आहेत. गरिबांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, पंचाहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना फुकट एसटीचा प्रवास, महिलांसाठी एसटी बस प्रवासात 50 टक्के सवलत अशा निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना सर्वसामान्यांचे आशीर्वाद मिळाला. 

8/16

सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले शिंदे यांचं शेती आणि शेतकऱ्यांवर विशेष लक्ष पाहिला मिळतं. पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानीमुळे त्यांनी शेतकऱ्यांना 700 कोटींची मदत जाहीर करुन मनं जिंकली. 

9/16

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्य कक्षाची कामगिरी, तर उत्कृष्ट ठरली आहे. दहा महिन्यांत 60 कोटी 48 लाखांची मदत दिली. राज्यातील एकही सर्वसामान्य गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही, याची काळजी मुख्यमंत्री जातीने घेत आहेत.

10/16

एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण ठाणे इथल्या किसननगर क्रमांक तीन येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. 23 येथे झाले. माध्यमिक शिक्षण ठाण्यातील मंगल हायस्कूलमध्ये झालंय. 

11/16

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. 

12/16

एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसननगर इथे शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार आणि प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन 1986 मध्ये सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्या वेळी बेल्लारीमधील तुरुंगात त्यांना 40 दिवस जेलमध्ये जाऊ आले होते. 

13/16

गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून 11 वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागलं होतं. मात्र शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. 2014 ते 2019 हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन बीए झाले. 

14/16

शिंदे यांना सन 1997 मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. सन 2001 मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदीची जबाबदारी मिळाली. 2001 ते 2004 अशी सलग तीन वर्षे ते या पदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. सन 2004 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 

15/16

जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन 2009, 2014 आणि 2019 अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले.  ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (2004) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले.   

16/16

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील काही महत्त्वाची खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती. गृहमंत्री, नगरविकासमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, वन आणि पर्यावरणमंत्री, पाणीपुरवठामंत्री, स्वच्छतामंत्री, मृद व जलसंधारणमंत्री, पर्यटनमंत्री, संसदीय कार्यमंत्री, माजी सैनिक कल्याणमंत्री अशी मंत्रिपदे त्यांनी सांभाळली.