भावा-भावांच्या जोड्या निवडणुकीच्या रिंगणात, एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवारी

Maharashtra Assembly Election 2024 : यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे दोन भाऊ निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.. महायुती आणि महाविकास आघाडीकडून एकाच कुटुंबातील दोन भावांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांना एकाच पक्षाने दोन वेगवेगळ्या मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली आहे. पाहूयात कोणत्या भावा-भावांच्या जोड्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

राजीव कासले | Oct 23, 2024, 17:00 PM IST
1/6

भावा-भावांच्या जोड्या निवडणुकीच्या रिंगणात, एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवारी

2/6

शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री उदय सावंत यांना रत्नागिरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांचे भाऊ किरण सामंत यांना राजापूर मतदार संघात तिकिट देण्यात आलंय. किरण सामंत लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक होते. पण नारायण राणे यांच्यामुळे किरण सामंत यांना माघार घ्यावी लागली.   

3/6

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार यांना तर बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. युगेंद्र पवार यांचा सामना काका अजित पवार यांच्याशी होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 

4/6

कोकणात राणे बंधुंना विधानसभेची तिकिटं देण्यात आली आहेत. नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून तर निलेश राणे यांना मालवण-कुडाळ मतदारसंघातून तिकिट मिळालं आहे. मालवण-कुडाळ ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याने निलेश राणे यांनी भाजपामधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

5/6

चांदवड-देवळा मतदारसंघात  राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.  विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर (Dr Rahul Aher) यांना भाजपकडून तिकिट देण्यात आलं आहे. तर नाफेडचे संचालक केदानाना आहेर (Keda Aher) हे अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेच्या आखाड्यात भाऊबंदकीची कुस्ती पाहायला मिळणार आहे.   

6/6

काँग्रेसने लातूर विधआनसभा मतदारसंघात पुन्हा एकदा देशमुख बंधुंवर विश्वास दाखवल आहे. लातूर शहरातून अमित देशमुख तर लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.