Maanvi Gagroo wedding: 'फोर मोअर शॉट्स प्लीज' फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकलं लग्न, पाहा PHOTO

Maanvi Gagroo wedding : बॉलीवूडमध्ये अशा सेलिब्रिटींची कमी नाही ज्यांनी गुपचूप लग्न केले आणि नंतर चाहत्यांना आश्चर्यचकित केले. आता या यादीत मानवी गाग्रूचे नावही सामील झाले आहे. जिने गुपचूप लग्न केले त्यानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर केले.   

Feb 23, 2023, 16:26 PM IST
1/6

कुमार वरुणशी बांधली लग्नगाठ

टीव्ही, चित्रपट आणि अगदी वेब सीरिजमधली फेम अभिनेत्री मानवी गगरूने गेल्या महिन्यात साखरपुडा केला होता. आज (23 फेब्रुवारी) तिने कुमार वरुणशी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

2/6

लग्नाचे फोटो शेअर

टीव्ही, चित्रपट आणि अगदी वेब सीरिजमध्येही काम करणाऱ्या मानवी गागरूने लग्नगाठ बांधली आहे. तिने स्वतः लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अतिशय सुंदर वधूच्या रुपात दिसत आहे. मानवी चमकदार साडीत वधू बनली.

3/6

मानवीने एब्रॉयड्री साडी नेसली

मानवीने लग्नात लाल रंगाची एब्रॉयड्री साडी नेसली होती. त्यावर पोलकी डायमंड ज्वेलरी आणि मांग टिका असा तिचा लूक आहे. तर कुमारने आयव्हरी रंगाची शेरवानी आणि त्यावर मोत्याचा नेकलेस घातला.  

4/6

तुमच्या आशीर्वादाची गरज

कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत आम्ही लग्नगाठ बांधली. तुमच्याकडून आम्हा दोघांना भरपूर प्रेम मिळालं. आता या नवीन प्रवासासाठी आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत. 

5/6

2008 पासून अभिनय क्षेत्रात प्रवेश

मानवी 2008 पासून अभिनय क्षेत्रात आहे. अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये काम केलेल्या मानवीने फोर मोट शॉट्स, मेड इन हेवन आणि ट्रिपलिंगसारख्या सुपरहिट वेब सीरिजही दिल्या आहेत. या माध्यमातून त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.

6/6

वरुण यांची पहिली भेट...

मानवी आणि वरुण यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. लग्नानंतर हे दोघं इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींसाठी सनडाउन पार्टी होस्ट करणार आहेत.