जगभरात याच महिलेची वाहवा! सगळे म्हणतात ही तर, Lady Elon Musk

Business News : या यादीत सध्या अशा एका नावाची चर्चा सुरुये, ज्या व्यक्तीची तुलना थेट टेस्लाच्या एलॉन मस्कसोबत (Elon Musk) होताना दिसतेय. 

Jun 29, 2023, 13:46 PM IST

Business News : जगभरात नेहमीच काही व्यक्तींच्या नावाची प्रचंड चर्चा होते. यासाठी त्या व्यक्तींनी संपादन केलेलं यश, त्यांची कामं, त्यांना मिळणारी लोकप्रियता आणि अर्थातच इतरही अनेक निकष कारणीभूत ठरतात. 

1/8

फोर्ब्स

Lucy Guo grabs attention because of her Billionaire status also known as Lady Elon Musk

थेट फोर्ब्सच्या यादीत मजल मारणारी ही महिला आहे तरी कोण? पाहा.... 

2/8

Alexandr Wang

Lucy Guo grabs attention because of her Billionaire status also known as Lady Elon Musk

आतापर्यंत Alexandr Wang जगातील सर्वात कमी वयाचा आणि स्वकर्तृत्वावर मोठा झालेला billionaire ठरला होता. Scale AI या स्टार्टअपमुळं तो सर्वांच्याच नजरेत आला. पण, असं करणारा तो एकटाच नाहीये. 

3/8

सहसंस्थापिका

Lucy Guo grabs attention because of her Billionaire status also known as Lady Elon Musk

या स्टार्टअपची सहसंस्थापिका Lucy Guo सुद्धा सध्या भल्याभल्यांल लक्ष वेधताना दिसतेय. कारण, हल्लीच तिनं 40 वर्षांहूम कमी वय असणाऱ्या सर्वाधिक श्रीमंतांच्या Forbes च्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला होता. 

4/8

संपत्तीचा आकडा

Lucy Guo grabs attention because of her Billionaire status also known as Lady Elon Musk

तिच्या संपत्तीचा आकडा  US$490 million इतका होता. या यादीत रिहाना, हुदा खत्तन, मारिया शारापोव्हा, टेलर स्विफ्ट यांच्या नावाचा समावेश असल्याचं सांगण्यात येतं.   

5/8

कोडिंग शिकली

Lucy Guo grabs attention because of her Billionaire status also known as Lady Elon Musk

Guo सर्वप्रथम कोडिंग शिकली. तिचे आई- वडील electrical engineering क्षेत्रात काम करत होते. पण, त्यांनी तिला कधीच या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केलं नाही. तरीही ल्युसीनं तिच्या वेगळ्या वाटा निवडल्या.   

6/8

Scale AI

Lucy Guo grabs attention because of her Billionaire status also known as Lady Elon Musk

Scale AI सुरु करण्याआधी तिनं कोरासाठीही काम केलं होतं ज्यानंतर ती स्नॅपचॅटची सर्वात पहिली महिला डिझायनर ठरली. ल्सुसीनं युट्यूबवर three-hour HIIT video सुद्धा अपलोड केला, जिथं तिची सुदृढ शरीरयष्टी पाहून अनेकजण भारावले. 

7/8

Lucy Guo

Lucy Guo grabs attention because of her Billionaire status also known as Lady Elon Musk

Lucy Guo ही सध्याच्या घडीची सर्वाधिक Fit व्यक्तीमत्वं म्हणूनही चर्चेचा विषय ठरते. दर दिवशी 16 ते 32 किलोमीटर धावणं, 5.5 तासांसाठी व्यायाम करणं तिच्या दिनचर्येचाच एक भाग आहे.   

8/8

आलिशान जीवनशैली

Lucy Guo grabs attention because of her Billionaire status also known as Lady Elon Musk

One Thousand Museum in Miami, Florida येथे तिनं तिच्या घरावर तब्बल  US$6.7 million चा खर्च केला आहे. जाणून आश्चर्य वाटेल पण David Beckham तिचा शेजारी आहे. आलिशान जीवनशैली, करिअरमध्ये प्रचंड यश या साऱ्यामुळं अनेकजण तिचा उल्लेख Lady Elon Musk म्हणूनही करत आहे.