द्रौपदीच्या गेल्या जन्मातील 'त्या' चुकीमुळे भगवान शंकराने दिल होतं 5 पतीचं वरदान

महाभारतातील द्रौपदीची व्यक्तीरेखा अतिशय शक्तीशाली स्त्री मानली जाते. द्रौपदीला यज्ञनेसी म्हणून देखील ओळखले जाते. पौरोणिक कथेनुसार द्रौपदी ही केवळ पांडवांची पत्नीच नव्हती तर एक योद्धा सुद्धा होती.

Jul 30, 2024, 16:19 PM IST
1/5

द्रौपदीच्या पूर्वीच्या जन्मात अधिक इच्छेमुळे किंवा लोभामुळे अशी चूक केली ज्यामुळे तिला पुढील जन्मात पाच पती मिळाले, अशी आख्यायिका आहे. 

2/5

महाभारताच्या आदिपर्वातील द्रौपदीच्या जन्माच्या कथेत व्यासजींनी लिहिलंय की, द्रौपदी ही  पूर्वीच्या जन्मी एक गरीब ब्राम्हण महिला होती. तिचा पतीचा आजाराने  मृत्यू झाल्याने तिला पती सुख मिळू शकलं नाही. तिला नेहमी असं वाटत रहायचं जर तिचा पती निरोगी आणि सर्वगुणांनी परिपूर्ण असता तर तिची प्रत्येक इच्छा पूर्ण झाली असती. या अतृप्त इच्छांचे ओझे तिला सतत त्रास देत होते. 

3/5

पूर्वी विधवा महिलांना खूप यातना सहन कराव्या लागत असायच्या. याशिवाय घरातील कमावती व्यक्ती निधन पावल्याने तिला अनेक वेळा उपाशीच रहावं लागलं होतं. अशा अतृप्त इच्छांचा भार सहन करावा लागेल म्हणून तिने भगवान शंकराची तपश्चर्या करण्याचा निर्धार केला.   

4/5

अनेक वर्ष तपश्चर्या केल्यावर महादेव प्रकट झाले. महादेव प्रकट झाल्यावर द्रौपदी खूप उत्साही झाली आणि तिच्या पुढील जन्मात सर्व गुण संपन्न असलेल्या पती वरदान म्हणून मागितला. 

5/5

राजा द्युपद्रने द्रोपदीच्या विवाहासाठी अट ठेवली होती त्यात अर्जुनने स्पर्धा जिंकली. त्यानंतर अर्जुन द्रौपदीला घेऊन घरी आल्यावर त्याने आईला आवाज दिला आहे हे बघ मी काय आणले आहे. त्यावेळी कुंती म्हणाली जे काही आणले आहे ते पाच भावांनी आपआपयात वाटून घ्या. अशा प्रकारे गेल्या जन्माचा चुकीमुळे द्रौपदीला पाच पती मिळालेत.