ठाण्यातील 'शिंदेंचा कार्यकर्ता' त्यांच्या पुत्रापेक्षाही श्रीमंत! ठाण्यात 4 घरं, 25 लाखांचं सोनं अन्.. एकूण संपत्ती..

Loksabha Election 2024 Mhaske Property Details: महायुतीच्या जागावाटपामधील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा ठरत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला असून तो थक्क करणार आहे. त्यांच्याकडे किती सोनं आहे, गाड्या आहेत, घरं आहेत पाहूयात...

Swapnil Ghangale | May 06, 2024, 16:23 PM IST
1/15

Loksabha Election 2024 Mhaske Property Details

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामधून महायुतीचे उमेदवार असलेल्या नरेश म्हस्केंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  

2/15

Loksabha Election 2024 Mhaske Property Details

उमेदवारी अर्ज दाखल करताना नरेश म्हस्केंनी त्यांच्या संपत्तीचं विवरणपत्र सादर केलं असून स्वत:च्या आणि पत्नीच्या नावावर एकूण 26 कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता असल्याचं घोषित केलं आहे.  

3/15

Loksabha Election 2024 Mhaske Property Details

म्हणजेच सध्या ठाण्यामध्ये 'धनुष्यबाणाचा कार्यकर्ता' तसेच एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ता म्हणून प्रचार करत असलेले नरेश म्हस्के हे मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि कल्याण मतदारसंघाचे विद्यमान खासदार तसेच यंदाच्या निवडणुकीतील उमेदवार श्रीकांत शिंदेंपेक्षाही श्रीमंत आहेत.   

4/15

Loksabha Election 2024 Mhaske Property Details

श्रीकांत शिंदेंनी त्यांच्याकडे पत्नी वृषाली यांच्या नावावर असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेसहीत 14 कोटी 43 लाख 80 हजार 790 रुपये इतकी मालमत्ता असल्याचं अर्जाबरोबर दाखल केलेल्या घोषणापत्रात म्हटलं आहे.    

5/15

Loksabha Election 2024 Mhaske Property Details

नरेश म्हस्केंनी त्यांची आणि त्यांच्या पत्नीची एकत्रित स्थावर आणि जंगम मालमत्ता 26 कोटी 26 लाख 2 हजार 215 रुपये असल्याचं जाहीर केलं आहे.  

6/15

Loksabha Election 2024 Mhaske Property Details

नरेश म्हस्केंना वारसा हक्काने 1 लाख रुपये संपत्ती मिळाल्याचं विवरणपत्रात म्हटलं आहे. तसेच त्यांच्यावर एकूण 7 गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख या प्रतिज्ञापत्रात आहे.  

7/15

Loksabha Election 2024 Mhaske Property Details

नरेश म्हस्केंनी त्यांच्याकडे टोयोटा इनोव्हा, हुंडाई क्रियेटा, टोयोटा फॉर्युनर या गाड्या असल्याचं म्हटलं आहे.  

8/15

Loksabha Election 2024 Mhaske Property Details

दागिन्यांसंदर्भातील माहितीही नरेश म्हस्केंनी दिली आहे. त्यांच्याकडे 6 लाख 65 हजारांचे सोने असून पत्नीकडे 19 लाख 50 हजारांचे सोने असल्याचं सांगितलं आहे.  

9/15

Loksabha Election 2024 Mhaske Property Details

महाडमध्ये तळीये गावामध्ये नरेश म्हस्केंच्या नावर शेतजमीन आहे असंही त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.   

10/15

Loksabha Election 2024 Mhaske Property Details

मुख्यमंत्री शिंदेंचे निकटवर्तीय असलेल्या नरेश म्हस्केंनी त्यांच्याकडे 5 लाखांची रोख रक्कम असल्याचं म्हटलं आहे. तर पत्नीकडे 3 लाख रुपये कॅश असल्याचं म्हटलं आहे.   

11/15

Loksabha Election 2024 Mhaske Property Details

तसेच जंगम मालमत्तेचा तपशील देताना म्हस्केंनी त्यांच्याकडे 6 कोटी 18 लाख 58 हजार 944 रुपयांची संतत्ती असल्याचं सांगितलं आहे.   

12/15

Loksabha Election 2024 Mhaske Property Details

स्थावर मालमत्तेसंदर्भात सांगायचं झाल्यास नरेश म्हस्केंनी त्यांच्याकडे 12 खोटी 3 लाख 48 हजार 783 रुपयांची संपत्ती असल्याचं जाहीर केलं आहे. म्हस्केंच्या पत्नीच्या नावावर 3 कोटी 96 लाख 40 हजार 383 रुपयांची स्थावर संपत्ती आहे.  

13/15

Loksabha Election 2024 Mhaske Property Details

नरेश म्हस्केंवर 3 कोटी 62 लाख 29 हजार 239 रुपयांचं कर्ज असून पत्नीवरील कर्जाची रक्कम 98 लाख 34 हजार 651 रुपये इतकी असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.  

14/15

Loksabha Election 2024 Mhaske Property Details

नरेश म्हस्केंच्या नावर ठाण्यात एकूण चार घरं आहेत. यापैकी ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटजवळच्या पालोमा सोसायटीमध्ये, सिद्धार्थ नगरमधील साई तीर्थ सोसायटी, पार्वती निवास अनुस्मृति आणि तीन हात नाका येथे रो हाऊस आहे. 

15/15

Loksabha Election 2024 Mhaske Property Details

तर नरेश म्हस्केंच्या पत्नीच्या नावरही चार घरं असल्याचा उल्लेख आहे. ही घर हिरानंदानी इस्टेटजवळील पालोमा सोसायटीमध्ये एक, सिद्धार्थ नगरमधील साई तीर्थ इथे एक, पाचपाखाडीतील दोस्ती वसंतामध्ये एक आणि तीन हात नाका येथे रो हाऊस आहे.