PHOTO : 16 व्या वर्षी लग्न, 17 व्या वर्षी आई, 25 व्या वर्षी घटस्फोट, सुपरस्टारशी लग्नानंतर संपलं अभिनेत्रीचं करिअर, आज पुन्हा...

फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली आज बॉलिवूडमध्ये करिअरच्या उंच शिखरावर आहे. 16 व्या वर्षी लग्न, 17 व्या वर्षी आई, 25 व्या वर्षी घटस्फोट, सुपरस्टारशी लग्न केल्यावर अभिनेत्रीचं करिअर संपलं होतं. पण आज ती बॉलिवूडमध्ये टॉपची कलाकार आहे. 

May 07, 2024, 00:05 AM IST
1/7

या चिमुकलीचा पहिलाच चित्रपट हा सुपर डुपर हिट झाला होता. अशात हिने आगामी चित्रपट साइन करण्याऐवजी लग्न केलं. एवढंच नाही तर ती एका मुलीची आईदेखील झाली. 

2/7

आम्ही बोलत आहोत, डिंपल कपाडिया हिच्याबद्दल. वयाच्या 16 व्या वर्षी अभिनेत्रीने ऋषी कपूरसोबत बॉबीमध्ये लॉन्च केलं. 

3/7

हा चित्रपट खूप गाजला अगदी बॉक्स ऑफिसवर त्याने धुमाकूळ घातला. पण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी डिंपल सुपरस्टार राजेश खन्नाच्या प्रेमात पडली. एवढंच नाही तर तिने राजेश खन्नासोबत लग्न केलं. 

4/7

राजेश खन्नासोबत लग्न झाल्यानंतर तिने चित्रपटसृष्टीपासून निरोप घेतला. वयाच्या 17 व्या वर्षी ट्विंकल खन्नाचा जन्म झाला. त्यानंतर रिंकीचा ही अजून एक मुलगी झाली. 

5/7

पण डिंपल आणि राजेश खन्ना यांच्या संसाराला तडा जाऊ लागला. लग्नाच्या 9 वर्षांनंतर वयाच्या 25 मध्ये डिंपलने राजेश खन्ना यांना घटस्फोट दिला. 

6/7

त्यानंतर ती पुन्हा चित्रपटसृष्टीकडे वळाली. कमी वयात लग्न आणि दोन मुलांनंतरही तिला चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम मिळालं.

7/7

आज ती राजेश खन्नापेक्षाही मोठी सुपरस्टार झालेली आहे. OTT वरही सिरीजमध्येही ती आपल्या अभिनयाची जादू चालवत आहे.