बॉलिवूडच्या 'या' बड्या सेलिब्रीटींनी का केलं नाही मतदान? कोण कोण आहे आहे या यादीत?

बॉलीवूडच्या कोणत्या सेलिब्रीटींनी मतदान केले नाही आणि का केले नाही जाणून घेऊया.

| May 21, 2024, 19:37 PM IST

Lok Sabha Elections: 20 मे रोजी राज्यात लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि अत्यंत महत्वाच्या टप्पा पार पडला. महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर  मतदान पडले. सर्व सामान्य जनतेसह सेलिब्रीटींनी देखील मतदानाचा हक्क बजावला. मात्र, बॉलिवूडच्या अनेक  सेलिब्रीटींनी मतदान केले नाही. 

 

1/7

 बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रीटींनी मतदान केलेले नाही. जाणून घेवूया कोणी मतदान केलेले नाही.  

2/7

प्रियांका चोप्रा जोनास

प्रियांका चोप्रा जोनास भारतीय असली तरी तिने अमेरिकेचे नागरिकत्व घेतलेले आहे. यामुळे तिला भारतात मतदान करता येत नाही.  

3/7

कतरिना कैफ

कतरिना कैफ सध्या लंडनमध्ये आहे. मात्र, ती भारतात असती तरी तिला मतदान करता आले नसते.  कारण कतरिना ब्रिटिश नागरिक आहे. 

4/7

विकी कौशल

अभिनेता विकी कौशल सध्या पत्नी कतरिनासोबत लंडनमध्ये आहे. सोमवारी त्याने कतरिनासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये दोघेही लंडनमध्ये एकत्र फिरताना दिसले. यामुळे मतदाना दिवशी तो मुंबईत नव्हता. 

5/7

आलिया भट्ट

पती रणबीर कपूरसह आलिया भट्ट मतदान केंद्राबाहेर दिसली. मात्र, तिने मतदान केले नाही.  आलिया ही ब्रिटिश नागरिक असल्याने तिला भारतात मतदानाचा अधिकार नाही.

6/7

अभिषेक बच्चन

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन एकत्र मतदान केंद्रावर दिसले. ऐश्वर्या राय बच्चन मात्र एकटीच मतदानासाठी आली होती. अभिषेक कुठेच दिसला नाही. अभिषेक मुंबईत नसल्यामुळे तो मतदान करु शकला नाही असे सांगितले जात आहे. मात्र, याची आम्ही पुष्टी करत नाही.  

7/7

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माने मतदान केलेले नाही. दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यापासून अनुष्का मिडीयापासून दूर आहे. यामुळे मतदानावेळी ती कुठेही दिसली नाही.