कानोसा विदर्भाचा : हे उमेदवार जिंकणार

२३ मेरोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला. 

May 21, 2019, 19:07 PM IST

२३ मेरोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला. यावेळी विदर्भातून धक्कादायक चित्र समोर आलं आहे. मागच्यावेळी विदर्भातल्या सगळ्या १० जागा जिंकणाऱ्या भाजप-शिवसेनेला यावेळी फक्त ५ जागांवर समाधान मानावं लागू शकतं, तर काँग्रेस-राष्ट्रवादी उरलेल्या ५ जागांसह विदर्भात जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे.

1/10

कानोसा नागपूरचा

कानोसा नागपूरचा

सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या नागपूरमध्ये नितीन गडकरींचा विजय होण्याची शक्यता असली, तरी त्यांचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटू शकतं. नागपूरमधून नितीन गडकरी काँग्रेसच्या नाना पटोलेंचा पराभव करतील, असा अंदाज आहे.   

2/10

कानोसा रामटेकचा

कानोसा रामटेकचा

रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने काँग्रेसच्या किशोर गजभिये यांना पराभूत करतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.   

3/10

कानोसा चंद्रपूरचा

कानोसा चंद्रपूरचा

चंद्रपूरमधून विद्यमान मंत्री हंसराज अहिर यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बाळू धानोरकर भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव करू शकतात.   

4/10

कानोसा गडचिरोलीचा

कानोसा गडचिरोलीचा

गडचिरोलीमधून काँग्रेसचे डॉ. नामदेव उसंडी भाजपच्या अशोक नेतेंचा पराभव करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   

5/10

कानोसा भंडारा-गोंदियाचा

कानोसा भंडारा-गोंदियाचा

भंडारा गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे भाजपच्या सुनिल मेंढेंचा पराभव करतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.   

6/10

कानोसा वर्ध्याचा

कानोसा वर्ध्याचा

वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना पराभूत करतील, अशी शक्यता आहे.   

7/10

कानोसा अमरावतीचा

कानोसा अमरावतीचा

अमरावतीमध्ये शिवेसेनेचे आनंदराव अडसूळ युवा स्वाभिमानीच्या आणि आघाडी पुरस्कृत उमेदवार नवनीत राणांचा पराभव करण्याचा अंदाज वर्तवला जातोय.   

8/10

कानोसा अकोल्याचा

कानोसा अकोल्याचा

अकोल्यामध्ये यावेळी भाजपचे संजय धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. पण या लढतीमध्ये भाजपचे संजय धोत्रे जिंकू शकतात.   

9/10

कानोसा यवतमाळ-वाशिमचा

कानोसा यवतमाळ-वाशिमचा

यवतमाळ-वाशिममध्ये काँग्रेसचे माणिकराव ठाकरे शिवसेनेच्या भावना गवळींचा पराभव करण्याची शक्यता आहे.   

10/10

कानोसा बुलडाण्याचा

कानोसा बुलडाण्याचा

बुलडाण्यामध्ये राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांच्यावर मात देऊ शकतात.