कृती सेननचा कारनामा...

Jan 27, 2018, 13:31 PM IST
1/5

Kriti sanon

Kriti sanon

बॉलिवूड स्टार कृती सेननने ऑडी क्यू7 ही नवीन कार खरेदी केली आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख राहिल अन्सारीने यांनी स्वतः या कारची डिलीव्हरी केली आणि ऑडी क्यू7 ची चावी कृतीला सुपूर्त केली. या गाडीची किंमत ८० लाख रूपये आहे. (फोटो सौजन्य- @AudiIN/Twitter)

2/5

Kriti sanon

Kriti sanon

आपल्या नव्या कारबद्दल कृती म्हणाली, या सुंदर गाडीची मालकीन झाल्याने मी खूप उत्साही आहे. यातून फिरायला मला नक्कीच आवडेल. मी ऑडी क्यू7 ची मोठी फॅन असून यात मिळणारा आराम, जागा आणि ड्राईव्हबिलिटी मला खूप भावते. मीडिया रिपोर्टनुसार, कृती प्रत्येक चित्रपटासाठी ३.२ कोटी रुपये चार्ज करते. (फोटो सौजन्य- DNA)

3/5

Kriti sanon

Kriti sanon

ऑडी इंडियाचे प्रमुख राहिल अन्सारी यांनी सांगितले की, मी कृती सेनन आता ऑडी परिवाराची सदस्य झाली असून त्यासाठी मी अत्यंत खूश आहे. हुशार, तरूण आणि यशस्वी लोकांचा हा ब्रॅंड आहे. कृतीसाठी ऑडी क्यू7 अत्यंत परफेक्ट आहे. जे स्टाईलसोबत महान व्यक्तित्वचे प्रतिनिधित्व करते आणि ते ट्रेंडसेटर आहे. (फोटो सौजन्य- DNA)

4/5

Kriti sanon

Kriti sanon

अंसारी यांनी सांगितले की, "ऑडी ब्रॅंड स्पोर्टीनेस, प्रगतिशीलता यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे बॉलिवूड स्टार्स, उद्योगपती यांसारखे लोक या कारला आपली पसंती दर्शवतात." (फोटो सौजन्य- DNA)

5/5

Kriti sanon

Kriti sanon

ऑडी क्यू7 मध्ये 3.0 टीडीआय इंजिन आहे. ज्यात 249 बीएचपी पॉवर आणि ६०० एनएमचे टार्क देते. ही कार ० ते १०० किलोमीटरचा स्पीड ७.१ सेकंदात सहज कव्हर करू शकेल.  (फोटो सौजन्य- @AudiIN/Twitter)