Mega Block : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वेवर 'मेगाब्लॉक'

 Konkan Railway Megablock News : कोकण रेल्वेवर उद्या 21 रोजी तीन तासांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. रत्नागिरी (Ratnagiri) ते वैभववाडी (Vaibhavwadi) दरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी  मेगाब्लॉक  आहे. 

| Jun 20, 2023, 15:25 PM IST
1/5

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी उद्या बुधवारी तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे. सकाळी 7.30 ते 10.30 या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे. 

2/5

गाड्यांच्या वेळापत्रकात बदल ।  रत्नागिरी (Ratnagiri News) ते सिंधुदुर्ग (Sindhudurg) दरम्यान वैभववाडी या विभागामध्ये घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे गाडी क्र. 11003 दादर - सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस (Tutari Express) रोहा ते रत्नागिरी दरम्यान 2.30 तास थांबवून ठेवण्यात येणार आहे. तसेच इतर गाड्या देखील थांबवल्या जातील. यात कोकण कन्या एक्सप्रेस (Konkan Kanya Express), मांडवी एक्स्प्रेस (Mandovi Express) याही गाड्या थांबवल्या जाणार आहेत.

3/5

आज 20 जून रोजी सुटणारी गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल - लोकमान्य टिळक (टी) नेत्रावती एक्सप्रेस (Netravati Express) उडुपी - कणकवली विभागादरम्यान 3 तासांसाठी थांबवून ठेवली जाणार आहे.

4/5

21 जून रोजी गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड - दिवा एक्स्प्रेसचा प्रवास सावंतवाडी रोड - कणकवली विभागादरम्यान 30 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

5/5

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल 37 गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे.  कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू झाले आहे. त्यामुळे गाड्यांचा वेग 40 किलोमीटर प्रतितास ठेवण्यात आला आहे. पावसाळ्यात प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ही वेगमर्यादा करण्यात आली आहे.