महाराष्ट्रातील असं शिव मंदिर जे वसलंय दोन दोन धबधब्यांच्या सान्निध्यात, इथे तुम्हाला दिसतो स्वर्गाचा दरवाजा

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील असं महादेव मंदिर जे दोन दोन धबधब्यांच्या सान्निध्यात वसलंय. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, इथे निसर्गाची एक किमयाही पाहिला मिळते. तुम्हाला इथे स्वर्गाचा दरवाजा पाहिला मिळतो. 

नेहा चौधरी | Aug 09, 2024, 16:43 PM IST
1/7

महाराष्ट्रातील असं एक शंकर देवाच मंदिर ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहितीय. दाट जंगलाच्या मध्यभागी वसलेले हे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी शैलीतील आणि काळ्या दगडांनी बनलेले आहे. 

2/7

मुख्य गर्भगृहाभोवती अनेक देवी देवातांच्या मूर्ती दिसतात. तर मंदिराच्या बाहेर एका बाजूला गणपती आणि दुसऱ्या बाजूला कालीमातेच मंदिर आहे. 

3/7

या मंदिराच्या परिसरात श्री खतेश्वर महाराज समाधी, एक तलाव आणि धबधबा आहे. हे या शहरातील सर्वोत्तम मंदिर आहे. 

4/7

पावसाळ्यात या मंदिराच्या सौंदर्यात अजून भर पडते. खेड्यातील रस्त्यांमधून काही किमी चालणे अत्यंत सुंदर अनुभव मिळतो. 

5/7

हिरवळ, डोंगर आणि धबधबा असलेले हे मंदिर मुंबई जवळील बदलापूरमध्ये माथेरान मार्गावर आहे. तुमचं नशिब असेल तर आकाशात तुम्हाला स्वर्गाचा दरवाजादेखील असतो. 

6/7

इथे निसर्गाची खरी सुंदरता पाहिली मिळते, ती जागा म्हणजेच कुंडेश्वर म्हणून ओळखली जाते. बदलापूरमार्गे – खारवाई-भोज-कोंडेश्वर, रेल्वेमार्गेने तुम्ही जाऊ शकता. तर बदलापूर पूर्व स्टँडवरून ऑटो भाड्याने घेऊ शकतो. रस्त्याने हा प्रवास अतिशय सुंदर आहे. 

7/7

भोज रिसॉर्टमध्ये राहण्याची सोय असून kondeshwar madir जवळ चहा आणि नाश्ता उपलब्ध आहे. इथे जाताना मात्र पैसे घेऊन जावे लागेल. कारण इथे ऑनलाइन पेमेंटची सोय नाही.