अक्रोडला ब्रेन फूड म्हटलं जातं. आपल्या मेंदूचं स्वास्थ उत्तम राखण्यासाठी अक्रोड फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये अनेक पोषक गुणधर्म आहेत. अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असल्याने हे सांधेदुखीसाठी गुणकारी ठरतं.
2/5
भिजवलेले अक्रोड खाणं, वजन कमी करण्यासाठी मदत करतं. अक्रोड कॅल्शियम, पोटॅशियम, आर्यन आणि झिंकचा उत्तम स्त्रोत आहे. अक्रोडमधील गुणधर्म रक्तप्रवाह सुरळित ठेवतात. दररोज अक्रोड खाल्ल्याने त्वचा चमकदार, तजेलदार होण्यास मदत होते.
TRENDING NOW
photos
3/5
अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. अक्रोड खाल्ल्याने नैराश्याचा धोका कमी होण्यास, ताण कमी करण्यास मदत करतं. दररोज अक्रोड खाल्ल्याने एकाग्रताही वाढत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.
4/5
दररोज सकाळी भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने डायबिटीज नियंत्रणात राहण्यास मदत होते. टाइप २ डायबिटीजग्रस्त लोकांसाठी अक्रोड अतिशय फायदेशीर ठरतं.
5/5
अक्रोडला एक एन्टी कॅन्सर फूडदेखील म्हटलं जातं. अक्रोडच्या सेवनाने प्रोस्टेट व ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. यामुळे वजन कमी होण्यासदेखील मदत होते.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.