फडणवीसांची एक्झिट...

Nov 26, 2019, 18:00 PM IST
1/5

भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला.   

2/5

महाराष्ट्रात सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपद भुषविण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

3/5

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, आपलं सरकार बहुमत सिद्ध करु शकत नसल्याने अवघ्या चार दिवसांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

4/5

२३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, अजित पवार यांनी काही कारणास्तव उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनाम देत असल्याचं जाहीर केलं.  

5/5

सत्ता स्थापनेसाठी, बहुमतासाठी जेवढे आकडे पाहिजेत, तेवढे आकडे भाजपाकडे नाहीत, म्हणून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.