OYO : माधुरी दीक्षित, गौरी खान, अमृता राव...'या' सेलिब्रिटींनी OYO Hotel मध्ये रस; काय आहे यामागील कारण?

OYO Hotel Share : अविवाहित कपल्समध्ये प्रसिद्ध असलेल्या OYO Hotel मध्ये आता सेलिब्रिटींना रस दिसून येत आहे. माधुरी दीक्षित, गौरी खान, अमृता राव यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी OYO Hotel चे शेअर खरेदी केले आहेत. काय त्यामागील कारण जाणून घेऊयात. 

| Jan 14, 2025, 15:11 PM IST
1/7

ओयो ही भारतातील सर्वात मोठी हॉटेल चेन कंपनी आहे. भारतात नाही तर जगभरात ओयोचे साम्राज्य पसरलंय. 

2/7

ओयो हे हॉटेल अविवाहित कपल्समध्ये खूप प्रसिद्ध आहे. पण हल्लीच बदललेल्या नियमामुळे आता फक्त पती - पत्नीला ओयोमध्ये रुम मिळणार आहे.

3/7

आता या ओयो हॉटेलमध्ये सेलिब्रिटींनीही रस दाखवला आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित, अमृता राव आणि बॉलीवूड निर्माती गौरी खान यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये ओयो या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे शेअर्स खरेदी केले आहेत. 

4/7

पीटीआयच्या सूत्रांनुसार गौरी खानने ऑगस्ट 2024 मध्ये बंद झालेल्या सीरीज जी फायनान्सिंग फेरीदरम्यान OYO चे 24 लाख शेअर्स खरेदी केले. कंपनीने गुंतवणूकदारांच्या संघातून 1,400 कोटींहून अधिक रक्कम उभारली. 

5/7

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, माधुरी दीक्षित, त्यांचे पती डॉ. श्रीराम नेने, क्लिनीशियन डॉक्टर, फ्लेक्स स्पेस कंपनी Innov8 चे संस्थापक, प्लाक्षा विद्यापीठाचे संस्थापक सदस्य आणि गुंतवणूकदार डॉ. रितेश मलिक यांनी Oyo चे 20 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. मात्र, कंपनीने हे शेअर्स किती किंमतीला खरेदी केले याचा खुलासा केलेला नाही.

6/7

त्याशिवाय अमृता राव आणि तिचा पती अनमोल सूद, एक लोकप्रिय रेडिओ जॉकी, यांनी देखील दुय्यम बाजारात ओयोचे शेअर्स खरेदी केले आहेत, असे कंपनीने म्हटलंय. 

7/7

पीटीआय सुत्रांनुसार नुवामा वेल्थने अलीकडेच ओयोमध्ये 53 रुपये प्रति शेअर दराने 100 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. याचा अर्थ कंपनीचे मूल्यांकन $4.6 अब्ज डॉलर आहे. जरी मूल्यमापन वाढले असले तरी ते $10 अब्जच्या शिखरापासून अजूनही दूर आहे.